Corona's blow to exams postponed medical course exams; Decision of Maharashtra University of Health Sciences

    सातारा : सातारा येथील मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने गुरूवारी मान्यता दिली आहे. यंदा डिसेंबरमध्ये शंभर विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश देता येणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून औपचारिक मान्यतेचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरवात केली जाणार आहे.

    वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा नगर येथे जलसंपदा विभागाचे 64 एकर क्षेत्र विस्तारित इमारत, वसतीगृह इतर सुविधांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घालून महाविद्यालयाच्या कामासाठी 419 कोटी रूपयांच्या तरतुदीला अर्थमंत्री या नात्याने गती दिली होती. भरघोस निधी उपलब्ध करून दिला.

    राष्ट्रीय वैयकीय आयोगाची प्रमाणित मानकांच्या परिपूर्ततेसाठी सातारा जिल्हा रुग्णालय, जम्बो कोविड हॉस्पिटल व सैदापूर येथील अरविंद गवळी. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीत पाचशे बेडचा कोटा आयोगाच्या निरीक्षणासाठी उपलब्ध करण्यात आला होता.

    राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या त्रिसदस्यीय पथकाने जुलै महिन्यात साताऱ्याचा दौरा करून विस्तारित इमारती, सहयोगी प्राध्यापक आस्थापना आकृतीबंध, प्रत्यक्ष जागेला भेट , इतर वैद्यकीय सुविधा , सर्वच गोष्टींची तपशीलवार माहिती घेतली होती . वैद्यकीय महाविद्यालयासाठी मेडिकल ट्रस्टची रथापना, राज्य सरकारची परवानगी, राज्यस्तरीय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परवानगी नंतरच महाविद्यालयाचा प्रस्ताव राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.

    या प्रस्तावाला शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अंतिम मंजुरी मिळाल्याचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले, सध्या महाविद्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात मिरज व पुणे येथील प्राध्यापकांची आस्थापना साताऱ्यात वर्ग करण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) च्या द्वारे होतात. यंदा नीटच्या दुसऱ्या टप्प्यात साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे समावेशन आणि डिसेंबरला प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येतील, अशी खुषखबर डॉ. संजय गायकवाड यांनी दिली .