काळ्या कायद्यांसह इंधन दरवाढविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

केंद्र सरकारने केलेले काळे शेतकरी कायदे, रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत, केंद्रातील भाजप सरकारने जनविरोधी निर्णय घेतले आहेत. इंधन गॅस, पेट्रोल, डिझेलच्या प्रचंड दरवाढीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे.

    कराड : शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. त्या पार्श्वभुमीवर आज दि. २६ रोजी दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून केंद्र सरकारने केलेला शेतकरी कायदा, पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ, गॅस दरवाढ विरोधी निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले.

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कराड येथे दत्त चौकात आज दि.२६ रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनास सुरुवात झाली. केंद्र सरकारने केलेला शेतकरीकायदा, पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ, गॅस दरवाढ विरोधी निषेध करण्यात आले. रद्द करा रद्द करा काळे कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.

    केंद्र सरकारने केलेले काळे शेतकरी कायदे, रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत, केंद्रातील भाजप सरकारने जनविरोधी निर्णय घेतले आहेत. इंधन गॅस, पेट्रोल, डिझेलच्या प्रचंड दरवाढीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. म्हणून संयुक्त किसन मोर्चा या बॅनरखाली देशातील ५०० पेक्षा जास्त संघटना, पक्ष एकत्र येऊन दिल्ली येथे शेतकरी बांधव गेली १०० दिवसांपासून जास्त काळ आंदोलन करत आहेत. या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती.

    या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार बटाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पोपटराव साळुंखे, अखतर अंबेकरी, शिवाजी पवार, सुहास पवार, मोहम्मद आवटे, अनिल धोतरे, गंगाधर जाधव,संभाजीराव सुर्वे, भाऊ पवार, सतीश भोंगाळेंसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.