MP Sambhaji Raje criticizes Sharad Pawar and Mahavikasaghadi government

नक्षलवाद्यांनो, या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या नागरिकांच्या, येथील हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरून भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. 'मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत,' असेही ते म्हणत आहेत. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करत आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

    सातारा : नक्षलवाद्यांनो, या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या नागरिकांच्या, येथील हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरून भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत,’ असेही ते म्हणत आहेत. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करत आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

    कुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते, तिच्यात उणीवा असणारच. लोकशाहीबाबत पण काहींचे वेगळे मत असू शकतात. परंतु जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारताने सुद्धा तिचा यशस्वी स्वीकार केला, यशस्वी वाटचाल सुद्धा करत आलो आहोत. काही उणीवा आजही असतील पण आपण त्यामध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न करायचे

    भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचेच नववे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘वन ऑफ द पिलर ऑफ इंडियन डेमोक्रेसी’ असे संबोधित केले होते. त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, की भारतात लोकशाही राज्य व्यवस्थेचे तुम्ही सुद्धा पाईक व्हा, असे आवाहन संभाजीराजेंनी या पत्राद्वारे नक्षल्यांना केले आहे.

    काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मत पेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे, असे संभाजीराजे यांनी पत्रात नमूद केले आहे.

    हे सुद्धा वाचा