सातारा तालुक्यातील चाचणींची संख्या २०० पार

  • सातारा तालुक्यात ९६ नव्या रूग्णांची नोंद झाली असून, काही गावांमध्ये ४८१ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे. त्यामुळे कोरोनाची वाढती संख्या पाहता, पंचायत समितीच्या आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचण्यांची नमुन्यांची संख्या अधिकपटीने वाढवली असून, ती २०० च्या वर गेली आहे.

सातारा – साताऱ्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढतच आहे. तसेच साताऱ्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सातारा तालुक्यात ९६ नव्या रूग्णांची नोंद झाली असून, काही गावांमध्ये ४८१ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे. त्यामुळे कोरोनाची वाढती संख्या पाहता, पंचायत समितीच्या आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचण्यांची नमुन्यांची संख्या अधिकपटीने वाढवली असून, ती २०० च्या वर गेली आहे.

कंटेन्मेंट झोन, क्वारंटाईन, नमुना चाचणीचे प्रमाण वाढवणे आदी उपाय राबवले जात असतानाही नागरिकांकडून उपायांना गांभीर्याने प्रतिसाद दिला जात नसल्याचे समोर आले आहे.  सातारा तालुक्यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून जिल्हयातील आणि तालुक्यांची संख्या जास्त आहे.

त्यामुळे कराडनंतर सातारा तालुका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात अंगापूर वंदनमध्ये ६ आणि शेळकेवाडीत ५ असे एकूण ११ नवे रूग्ण आढळून आले होते. त्यामुळे सातारा तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.