म्हसवड येथील अंगणवाडी येथे पोषण पंधरावडा अतंर्गत आहाराची माहीती देताना अंगणवाडी सेविका सय्यद, नगरसेविका स्नेहल सूर्यवंशी, सुजाता देशमुख आदी.
 म्हसवड येथील अंगणवाडी येथे पोषण पंधरावडा अतंर्गत आहाराची माहीती देताना अंगणवाडी सेविका सय्यद, नगरसेविका स्नेहल सूर्यवंशी, सुजाता देशमुख आदी.

गरोदर-स्तनदा मातांना कोणता आहार फळे, भाज्या, यांचे सेवन करावे, माता व बालक यांचा आहार कसा असावा याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे आहाराविषयक प्रबोधन होण्यासाठी पोषक धान्य, फळे, भाज्या व सात्विक आहाराचे व प्रबोधनात्मक रांगोळीचे प्रदर्शन ही भरवण्यात आले होते.

    म्हसवड : सुदृढ सशक्त बालक हीच राष्टाची खरी संपत्ती असते. सामान्य जनमानसांत सकस आहाराविषयक जनजागृती व भावी पिढी आरोग्यदायी व्हावी याच संकल्पनेवर भर देऊन शासनाच्या निर्देशानुसार सर्वत्र पोषण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून म्हसवड ता माण येथे बालविकास प्रकल्प सातारा नागरी अंतर्गत मुख्य सेविका रेखा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली सेविका शमीम सय्यद यांच्या अंगणवाडी क्रमांक ९७ येथे बीट स्तरीय पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास येथील नगरसेवक डाॅ वसंत मासाळ, विद्यमान नगरसेविका स्नेहल सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी गरोदर-स्तनदा मातांना कोणता आहार फळे, भाज्या, यांचे सेवन करावे, माता व बालक यांचा आहार कसा असावा याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे आहाराविषयक प्रबोधन होण्यासाठी पोषक धान्य, फळे, भाज्या व सात्विक आहाराचे व प्रबोधनात्मक रांगोळीचे प्रदर्शन ही भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नगरसेवक डाॅ वसंत मासाळ व विद्यमान नगरसेविका सौ स्नेहल सुर्यवंशी मॅडम यांनी उपस्थित पालकवर्ग व अंगणवाडी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले व सदर कार्यक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.

    या प्रसंगी ग्रामबाल स्वरक्षण समितीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या समितीची माहिती देण्यासाठी सुजाता देशमुख जिल्हा स्तरावरुन आल्या होत्या त्यांनी ग्रामबाल स्वरक्षण समितीच्या कामाविषयी मार्गदर्शन केले व स्थानिक पातळीवर समितीची स्थापना करावी असे आवाहन केले.

    पोषण पंधरवडा कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, माणदेशी महिला बॅकेचे कर्मचारी व पालकांनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्य सेविका  रेखा घोरपडे व त्यांच्या टीमने विषेश परिश्रम घेतले. या कार्यक्रमास त्या प्रभागातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस कोरोना पाश्र्व॔भूमिवर योग्य खबरदारी घेऊन उपस्थित होत्या.