राजेशाही असती तर… औरंगाबादच्या नामांतरावर उदयनराजेंची रोख ठोक प्रतिक्रिया

औरंगाबाद शहराचं नामांतर करण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत. काँग्रेसचा नामांतराला विरोध आहे. यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील यावर भाष्य करत आपली भूमिका मांडली आहे. बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचाही निर्णय घेतला असता अशी रोख ठोक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सातारा : औरंगाबाद शहराचं नामांतर करण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत. काँग्रेसचा नामांतराला विरोध आहे. यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील यावर भाष्य करत आपली भूमिका मांडली आहे.

बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचाही निर्णय घेतला असता अशी रोख ठोक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

बॉम्बेचं मुंबई झाले. लोकशाहीत जनता राजे आहेत. त्यामुळे याबाबत जनताच निर्णय घेईल. याबाबत मला काय वाटतं यापेक्षा लोकांनी निर्णय घ्यावा. राजेशाही असती तर मी निर्णय घेतला असता असेही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, महाआघाडी सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही, असं म्हणत थोरातांनी नामांतरचा विरोध स्पष्टपणे जाहीर केला. मात्र, या नंतरही शिवसेनेकडून शासकीय पातळीवर संभाजीनगर असा उल्लेख होत राहिला आहे. याबाबत काँग्रेसकडून सातत्याने शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे.

‘वर्षानुवर्षं आम्ही संभाजीनगर असाच उल्लेख करत आलो आहोत आणि पुढेही तेच करणार. बाळासाहेबांनीही हाच उल्लेख केला होता अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.