नांदोशी येथे घोरपडीची शिकार प्रकरणी आरोपीसह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी
 नांदोशी येथे घोरपडीची शिकार प्रकरणी आरोपीसह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी

वनविभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी शीतल पुनदे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि..-१९ रोजी नांदोशी ता -खटाव येथील दिनकर धोंडू शिंदे यांनी नांदोशी गावच्या हद्दीत गोसाव्याचा शिवार मधील मालकी क्षेत्रात दोन घोरपडीच्या शिकार करून त्या स्वतःच्या घरी आणून ठेवल्याची माहिती वनविभागास मिळताच वनक्षेत्रपाल शीतल पुनदे,वनपाल रामदास घावटे,वनरक्षक बिरु जावीर यांनी त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता आरोपीच्या स्वयंपाक घरात दोन मृत घोरपडी सापडल्या त्यात एक सोललेल्या अवस्थेत तर एकाचे मांस तयार केलेले आढळून आले.

    वडूज : घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी नांदोशी ता -खटाव येथील एक जणाविरुद्ध वनविभागाने गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर केले असता आरोपीस एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

    याबाबत वनविभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी शीतल पुनदे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि..-१९ रोजी नांदोशी ता -खटाव येथील दिनकर धोंडू शिंदे यांनी नांदोशी गावच्या हद्दीत गोसाव्याचा शिवार मधील मालकी क्षेत्रात दोन घोरपडीच्या शिकार करून त्या स्वतःच्या घरी आणून ठेवल्याची माहिती वनविभागास मिळताच वनक्षेत्रपाल शीतल पुनदे,वनपाल रामदास घावटे,वनरक्षक बिरु जावीर यांनी त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता आरोपीच्या स्वयंपाक घरात दोन मृत घोरपडी सापडल्या त्यात एक सोललेल्या अवस्थेत तर एकाचे मांस तयार केलेले आढळून आले. त्यानंतर संशयित आरोपी दिनकर शिंदे याच्यावर भारतीय वन्यजीव सवरक्षण १९७२ चे कलम ९/३९/४४/५० अन्वये वनगुन्हा नोंद करून आरोपीस अटक करून वडूज येथील न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी सुनावली.

    या घटनेचा तपास सातारा उपवनसंरक्षक एम.एन. मोहिते ,सहायक वनसरक्षक एस.बी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सौ.शीतल पुनदे करीत आहेत.