पाडेगावचा भोंदूबाबा लोणंद पोलिसांच्या जाळ्यात ; अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून कारवाई

विठ्ठल किसन गायकवाड राहणार पाडेगाव ता खंडाळा जि.सातारा येथील करणी भूतबाधा उतरवण्याचा दावा करून लुबाडणाऱ्या भोंदू देवरूषी याचे कारनामे वाढत्याची तक्रार अंधश्रध्दा निर्मूलन समितीला प्राप्त झाली होती.गायकवाड महाराज हा गेली २ ते अडीच वर्षे स्वतः च्या अंगात दत्त संचारला आहे असे सांगून दर मंगळवार शुक्रवारी व अमावास्या पौर्णिमा या दिवशी मोट्या प्रमाणात दरबार भरवून येणाऱ्या भक्तांच्या कोणत्याही अडचणींवर उदा करणी काढणे भूतबाधा काढणे मूल न होणे कोणतीही शारीरिक समस्या १०० टक्के दैवी उपाय सांगणारा हा भोंदू मोट्या प्रमाणात आपले बस्तान वाढवीत होता.

    लोणंद : सातारा येथील अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून पाडेगाव ता खंडाळा येथील करणी बाधा उतरविण्याचा दावा करणाऱ्या विठ्ठल किसन गायकवाड याला लोणंद पोलिसांनी शनिवारी अटक केली . त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांच्या या कारवाईने पाडेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

    या घटनेची माहिती अशी, विठ्ठल किसन गायकवाड राहणार पाडेगाव ता खंडाळा जि.सातारा येथील करणी भूतबाधा उतरवण्याचा दावा करून लुबाडणाऱ्या भोंदू देवरूषी याचे कारनामे वाढत्याची तक्रार अंधश्रध्दा निर्मूलन समितीला प्राप्त झाली होती.गायकवाड महाराज हा गेली २ ते अडीच वर्षे स्वतः च्या अंगात दत्त संचारला आहे असे सांगून दर मंगळवार शुक्रवारी व अमावास्या पौर्णिमा या दिवशी मोट्या प्रमाणात दरबार भरवून येणाऱ्या भक्तांच्या कोणत्याही अडचणींवर उदा करणी काढणे भूतबाधा काढणे मूल न होणे कोणतीही शारीरिक समस्या १०० टक्के दैवी उपाय सांगणारा हा भोंदू मोट्या प्रमाणात आपले बस्तान वाढवीत होता. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत पोतदार यांना माहिती मिळताच त्यांनी त्याचे सहकारी डॉ.दीपक माने ऍड.हौसेराव धुमाळ थेट दरबारात गुप्त पणे साध्या वेशात भक्त बनून जाऊन समस्यांचा पाढाच गाईला. त्यांना मोठी करणी झाली आहे. नागिणी चा त्रास आहे ८ महिन्यात १०० टक्के मूल होईल असे सांगितले व ११ फेऱ्या करायला लावल्या. यावरून अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आले की तो भक्तांची आर्थिक मानसिक फसवणूक करत आहे.

    ही सर्व बाब अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना कळवली . व हा भोंदू जादूटोणा विरोधी कायद्याचा भंग करत आहे हे निदर्शनास आणून दिले.त्यांनी याची गंभीर दखल घेऊन लोणंद पोलीस स्टेशन चे अधिकारी चौधरी साहेब यांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.आज सकाळी अंनिस कार्यकर्ते यांनी लोणंद पोलिस स्टेशन गाठले व तेथील अधिकारी व त्यांची टीम घेऊन प्रत्यक्ष भोंदू बाबाचा दरबार गाठला.अमावस्या असल्याने दरबारात मोठ्या प्रमाणात भक्त आलेले होते. अंगात देवाचा संचार आणून समस्या सोडवणे सुरूच होते. पोलिसांना बघताच महाराज यांना घाम फुटला. सर्व आंखो देखा पाहिल्यावर महाराजांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली.