चित्रकार बाबा पवार यांच्या शुभेच्छापत्रांची ‘महाराष्ट्र बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद  

ओंड (ता. कराड) येथील प्रतिथयश चित्रकार बी. एस. तथा बाबा पवार यांच्या ‘काव्यचित्र शुभेच्छापत्र’ या उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद झाली आहे.  यानिमित्ताने शब्दवेध संस्थेच्यावतीने पवार यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करीत शुभेच्छा पत्रांचा तपपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. कराड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कराड : ओंड (ता. कराड) येथील प्रतिथयश चित्रकार बी. एस. तथा बाबा पवार यांच्या ‘काव्यचित्र शुभेच्छापत्र’ या उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद झाली आहे.  यानिमित्ताने शब्दवेध संस्थेच्यावतीने पवार यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करीत शुभेच्छा पत्रांचा तपपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. कराड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कराड अर्बन बँकेचे संचालक अॅड. संभाजीराव मोहिते व ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांच्या हस्ते बाबा पवार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महाबळेश्वर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, कराड शिक्षण मंडळाचे सहसचिव राजेंद्र लाटकर, ओंड येथील पी. जी. व्ही. पी. हायस्कूल व ज्युनियर काॅलेजच्या प्राचार्या सुलभा शिंदे, पर्यवेक्षक रमेश गुरव, ओंड शिक्षण मंडळ ओंडचे सचिव शंकरराव थोरात, संचालक शरद शिंदे, शब्दवेधचे सभासद व बाबा पवार यांचे हितचिंतक उपस्थित होते. प्रास्ताविक त्रिनेत्रनाथ जोशी यांनी केले. आभार डाॅ. माधुरी कुराडे यांनी मानले. मानसी जोशी यांनी सुत्रसंचालन केले.
चित्रकार पवार यांनी समाजाचे वास्तव चित्रण मांडणारी काव्यचित्र संकल्पना राबवून वैविध्यपूर्ण व अाशयपूर्ण  शुभेच्छापत्रे साकारली आहेत. सलग बारा वर्षे हा उपक्रम राबवून त्यांनी राष्ट्रीय विक्रम केला आहे. या उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक आॅफ रेकॉर्ड’ने नोंद घेत त्यांचा कार्याचा गाैरव केला. पवार चित्र, शिल्प व जादूचे प्रयोग या माध्यमातून समाजजागृती करीत आहेत. उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. ओंड येथील पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूलमध्ये ते कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.