खंडाळा घाटाजवळ आढळला अर्धवटस्थितीत जळालेला महिलेचा मृतदेह

    सातारा : खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडाळा घाटाजवळ एका निर्जनस्थळी पोलिसांना आज अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.

    मृत महिलेच्या बोटांमध्ये अंगठ्या असून, डाव्या हातावर काहीतरी गोंदलेली खूण आहे. मृताच्या अंगावरील काही कपडे जळालेल्या स्थितीमध्ये आढळून आले. धीरज पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाबाबत आवश्यक सूचना केल्या. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचे धीरज पाटील यांनी सांगितले. अज्ञातांविरुद्ध खंडाळा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत महिलेची ओळख पटवणं आणि त्यानंतर संशयितांचा शोध घेणं हे पोलिसांपुढे आव्हान आहे.