जावली तालुक्यातील वरोशी येथे ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

    केळघर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नेहरू युवा मंडळ वरोशी यांच्यावतीने ५० झाडे लावण्यात आली. गेल्यावर्षी नेहरू युवा मंडळाने ५०० झाडे लावण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार गेल्या वर्षी २०० झाडांचे लागवड व जतन उद्दिष्ट पूर्ण ही केल्याचे नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष व उपसरपंच संदीप कासुर्डे यांनी सांगितले.

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी (दि.५) मंडळाच्या वतीने वड, पिंपळ कवट, बेल, कडुलिंब, चिंच, करंज यांची ५० झाडे लावण्यात आली. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, सुनील नाना जांभळे, नंदकुमार चिकणे, आभेश ओंबळे, पार्थ चिकणे, मंडळाचे अध्यक्ष संदिप कासुर्डे, विकास कासुर्डे, विलास कारंडे, माजी सरपंच संतोष कासुर्डे, सखाराम कारंडे, अमर देसाई यांच्यासह नेहरू युवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.