बायोमायनिंगच्या थर्ड पार्टी ऑडिटमध्ये राजकीय गोलमाल : १ कोटी ९० लाखाच्या बिलाला सशर्त परवानगी ; ऑडिटरही लागला नगरसेवकांच्या गळाला

लेखापालांपासून अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना काही टक्क्यांचा प्रसाद मिळाल्याची खसखस असल्याने साताऱ्यात बायोमायनिंग मध्ये बरेच पाणी मुरल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे . गेल्या तीन वर्षापासून सोनगावच्या कचरा डेपोत बायोमायनिंगची मशिनरी उभारून टाकाऊ पदार्थांना नैसर्गिक रित्या कुजवून लिचड ( खत ) तयार करण्याचे काम सुरू आहे . मुळातच हा प्रकल्प २ कोटी ९० लाख रूपयांचा असताना त्यांचे बजेट ६ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत कसे वाढले हे समजायला मार्ग नाही .

    सातारा : बायोमायनिंग च्या प्रकल्पात सातारकरांना खतनिर्मितीच्या नावाखाली उल्लू बनविण्याचे काम राजरोसपणे चालू आहे . या प्रकरणी नगरसेवक वसंत लेवे यांनी नगरविकास विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार केलेली असताना बायोमायनिंगच्या भागीदारांनी थर्ड पार्टी ऑडिटर ला बिदागी देउन १ कोटी ९० लाखाचे बिल मंजूर केल्याची चर्चा आहे .

    या प्रकरणात लेखापालांपासून अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना काही टक्क्यांचा प्रसाद मिळाल्याची खसखस असल्याने साताऱ्यात बायोमायनिंग मध्ये बरेच पाणी मुरल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे . गेल्या तीन वर्षापासून सोनगावच्या कचरा डेपोत बायोमायनिंगची मशिनरी उभारून टाकाऊ पदार्थांना नैसर्गिक रित्या कुजवून लिचड ( खत ) तयार करण्याचे काम सुरू आहे . मुळातच हा प्रकल्प २ कोटी ९० लाख रूपयांचा असताना त्यांचे बजेट ६ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत कसे वाढले हे समजायला मार्ग नाही .टाकाऊ पदार्थाचे प्लास्टिक बाजूला करून एका शेततळ्यात ते कुजवून त्याचे खत बनवायचे असून त्याची विक्री पालिकेने करावयाची असताना टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने लावायची असताना या पदार्थांची भूमी भराव पध्दतीने करण्यात येत आहे . या चुकीच्या कामकाजावर सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक वसंत लेवे यांनी आक्षेप घेऊन त्याची तक्रार विभागीय आयुक्तांसह नगर विकास विभागाच्या सचिवांकडे केली आहे .या प्रकल्पाती ल शेततळ्याचा कागद फाटला असून अंतर्गत जलवाहिन्या सुध्दा तुंबल्या असताना या प्रकल्पाच्या राजकीय भागीदारांनी पुण्यावरून आलेला थर्ड पार्टी ऑडिटर खास बिदागी देऊन मॅनेज केल्याची माहिती आहे . हा ऑडिटर पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्राध्यापक आहे . या ऑडिटरच्या थर्ड पार्टी ऑडिट नंतर दोनच दिवसा पूर्वी १ कोटी ९० लाख रुपयांच्या बिलाला हिरवा कंदिल देण्यात आला .पालिकेतल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याचीच कंपनी या ठेक्यात सहभागी असून कागदोपत्री तिसराच माणूस पा कंपनीचा भागीदार दाखविण्यात आला आहे . या ऑडिट वर सुद्धा लेखी आक्षेप असताना परस्पर बिल निघाल्याने या प्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचे वसंत लेवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले .

    बांधकाम विभागातील एका अभियंत्याने याचे बिल बनविले असून लाभाच्या मालिद्यात अनेक जणांची नावे समोर येत आहे . सातारकरांच्या कराच्या पैशावर चुकीच्या पध्दतीने डल्ला मारण्याचे काम हे खरोखर संताप आणणारे आहे .