माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना इन्कम टॅक्स विभागाने हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या दहा वर्षात उत्पन्नात वाढ कशी झाली. याबाबत नोटीसीत विचारणा करण्यात आल्याची माहीती खुद्द चव्हाण यांनीच पत्रकारांना दिली. याबाबत योग्य खुलासा विभागाकडे करणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

कराड (Karad).  राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना इन्कम टॅक्स विभागाने हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या दहा वर्षात उत्पन्नात वाढ कशी झाली. याबाबत नोटीसीत विचारणा करण्यात आल्याची माहीती खुद्द चव्हाण यांनीच पत्रकारांना दिली. याबाबत योग्य खुलासा विभागाकडे करणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

खुलासा करण्यासाठी ८ ते १० दिवसात इन्कम टॅक्स कार्यालयात समक्ष स्वतः हजर राहावे, असे दिलेल्या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. गत सहा वर्षात मोदी सरकारवर केलेल्या शाब्दिक हल्ल्याने आकसाने सदरची नोटीस पाठवली आहे काय? अशी विचारणा केल्यावर आ. चव्हाण म्हणाले काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न आहे. मी माझ्या नोटीसीला योग्य ते उत्तर देणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांना फार पूर्वीच चौकशीच्या नोटिसा दिल्या. माझा नंबर महाराष्ट्रात पहिला लागला एवढेच काय ते विशेष. या बाबत योग्य स्तरावरील सर्व माहिती संबंधित यंत्रणेला दिली जाईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

बिहार निवडणूक निकालाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, नितीशकुमार यांना भाजपने संपविण्याचा कट निश्चित केला. त्यामुळेच पासवान यांनी भाजपच्या नव्हे, तर नितीशकुमार यांच्या उमेदवारांविरोधात आपले उमेदवार दिले. त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. सध्या बिहार राज्यावर नितीशकुमार यांची हुकूमत असली तरी, भाजपला ती मान्य नसल्याने नितीशकुमारांना निवडणुकीत कमी जागावर समाधान मानावे लागले. निवडणुकीत तेजस्वी यादव यांची उत्तम कामगिरी पहायला मिळाली आहे. ही भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. बिहारमध्ये काॅंग्रेसला समाधानकारक यश मिळाले नसले तरी आगामी काळात काॅंग्रेस पक्ष मोठ्या फरकाने उभारी घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.