pruthviraj chavhan

देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (pruthviraj chavhan criticized central government)यांनी केला आहे .

  कराड : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२१ मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना ‘भारताने कोरोनाला कसे हरवले’ अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा हास्यास्पद प्रकार आता अंगलट येत आहे. जगातील ५० पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(pruthviraj chavhan) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

  चव्हाण यांनी म्हटले आहे की, आज देशाला मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मृत्यूमुखी पडले त्यांना उत्तरे हवी आहेत. देशाच्या या दुरावस्थेला जबाबदार असलेले आरोग्य मंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

  देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे .

  ऑक्सिजन पुरवठ्याचं काय झालं ?

  चव्हाण यांनी म्हटले आहे की, केंद्रीय आरोग्य सचिवांच्या २० ऑक्टोबर २०२०ला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते. त्यांनी काही दाखले दिले आहेत, त्यात पाच महिन्यांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले होते की, वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत आहे. मागील दहा महिन्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही.  त्याचे काय झाले? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

  रुग्णालयांची उच्च न्यायालयात धाव

  देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी  केलेल्या प्रयत्नाबद्दल सांगताना ते म्हणाले, केंद्र शासनाने देशभरातील ३९० दवाखान्यात PSA पद्धतीचे ऑक्सिजन निर्मितीसाठी प्लॅन्ट उभारण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाची संभाव्य वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, केंद्र सरकारने १ लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

  सचिवांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते की सरकारने अतिरिक्त १लाख MT ऑक्सिजन आयात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली. परंतु मोदी सरकारने ती कार्यान्वित केली नाही, त्यामुळे आज देशाला अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दवाखाने आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे मिनिटा-मिनिटाला फोन येत आहेत. रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या बातम्या देशभरातून येत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. हे अत्यंत विदारक चित्र आहे.

  या प्रश्नांची द्या उत्तरे
  केंद्र सरकारने खालील प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे .
  १) ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत “आपण अत्यंत सुस्थितीत (extremely comfortable) आहोत ”,  हा दावा आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारावर केला होता?
  २) १ लाख मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयातीचे काय झाले ? ५ महिन्यात ते का आयात केले नाही ?  ही प्रक्रिया कोणी थांबवली?
  ३) आत्तापर्यंत देशभरात मंजूर केलेल्या १६२ PSA पद्धतीचे ऑक्सीजन निर्मिती प्लॅन्ट पैकी फक्त ३३ दवाखान्यातच उभा केले आहेत, हे खरे आहे का?