दै. ‘नवराष्ट्र’चा अंक दर्जेदार : माजी सभापती संदीप मांडवे

    वडूज/डॉ. विनोद खाडे : ‘नवभारत’ मीडिया ग्रुपचा मराठी वाचकांसाठी अत्यंत माहितीपूरक असलेला ‘दै. नवराष्ट्र’ हा अंक सर्व समावेशक व दर्जेदार असल्याचे मत खटाव पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य संदीप मांडवे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाची विशेष पुरवणी दै. नवराष्ट्रने प्रकाशित केली होती. या पुरवणीसह अंकाचं वाचन संदीप मांडवे यांनी करून यामध्ये असलेल्या सुबक मांडणीचं विशेष कौतुक केलं.

    ‘दै. नवराष्ट्र’च्या अंकात देश-विदेशातील घडामोडी, राजकीय घडामोडी, सामाजिक प्रश्नांवर आवाज, आधुनिक तंत्रज्ञान, कला व मनोरंजन क्षेत्र, क्रीडा, कृषी व उद्योग क्षेत्रातील ताज्या घडामोडी तसेच शहरी व ग्रामीण भागातील इत्यंभूत माहिती आदींचा समावेश आहे. बातम्या अतिशय सुबकपणे मांडून त्यातील वास्तव वाचकांसमोर ठेवण्यात दै. नवराष्ट्र अग्रेसर ठरत आहे. त्यामुळे समाजातील अनेक प्रश्नांची उकल होण्यास निश्चितच मदत होणार आहे. हा सर्वसमावेशक अंक निश्चितच एका उच्चस्थानी असल्याचेही संदीप मांडवे यावेळी सांगितले.