सातारा जिल्ह्यात २०० कोरोनाबाधित नव्या रूग्णांची नोंद

  • आज शनिवारी ८ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यात तब्बल २०० कोरोनाबाधित रूग्णांची नव्याने नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. साताऱ्यात आज २०० कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून, जिल्ह्यातील एकूण संख्या ५ हजार ३७९ इतकी झाली आहे.

सातारा – सातारा जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच आज शनिवारी ८ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यात तब्बल २०० कोरोनाबाधित रूग्णांची नव्याने नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. साताऱ्यात आज २०० कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून, जिल्ह्यातील एकूण संख्या ५ हजार ३७९ इतकी झाली आहे. तर २ हजार ४९३ जणांनी कोरोनावर य़शस्वीपणे मात केली आहे.

सद्यस्थितीला २  हजार ७२३  रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  सातारा, कराड, कोरोगाव, फलटण, वाई, शिरवळ-खंडाळा, रायगाव, पानमळेवाडी, मायणी, महाबळेश्वर, पाटण, दहिवडी, खावली अशा अनेक भागांतील मिळून जवळपास ४६४ जणांची कोरोना टेस्ट क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय करण्यात आली आहे. तसेच पुणे आणि कराड येथील ठिकाणी हे अहवाल तपासणी करीता पाठवण्यात आल्याचे येथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.