सातारा जिल्ह्यात ५८९ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

काल मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार ५८९ जणांचा तपशील आज मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये (Corona Care Center) उपचार घेत असलेल्या १८६ नागरिकांना दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. तर ६१७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

सातारा : संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. सातारा जिल्ह्यात (Satara District) आज बुधवारी ५८९ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद (New Corona Cases) करण्यात आली आहे. त्यामुळे जिह्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या १५ हजार २४७ इतकी झाली आहे. तर १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Deaths) झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार ५८९ जणांचा तपशील आज मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये (Corona Care Center) उपचार घेत असलेल्या १८६ नागरिकांना दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. तर ६१७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील एकूण ४५ हजार ७२३ जणांचे नमुने घेण्यात आले असून १४ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ हजार ७७८ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात एकूण ४१४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.