‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, शरद पवारांच्या पुढाकाराने साफसफाई

भाऊसाहेब कराळे आणि डॉ. अरविंद बुरुंगले या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल कऱण्यात आल्या होत्या. नोकरभरती आणि इतर कारणांवरून या दोघांविरोधात अनेक तक्रारी होत्या. हे दोघे संस्थेचे माजी सचिवदेखील आहेत.

साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले. या दोन सदस्यांविरोधात तक्रारी दाखल झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष असणाऱ्या शरद पवार यांनी या दोन सदस्यांना राजीनामे द्यायला लावत त्यांचे राजीनामे मंजूर केले.

भाऊसाहेब कराळे आणि डॉ. अरविंद बुरुंगले या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल कऱण्यात आल्या होत्या. नोकरभरती आणि इतर कारणांवरून या दोघांविरोधात अनेक तक्रारी होत्या. हे दोघे संस्थेचे माजी सचिवदेखील आहेत.

या दोघांविरोधात सातत्यानं तक्रारी येत असल्याची बाब संस्थेतील विविध मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांनी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवली होती. कर्मचाऱ्यांच्या या तक्रारीची दखल घेत पवारांनी या दोघांना राजीनामे देण्याची सूचना करून ते मंजूर केले.

त्यापूर्वी संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना पवारांनी बोलावून घेतले होते आणि त्यांच्याकडे याबाबत विचारणादेखील केली होती. या बैठकीनंतर कारवाई करण्याचे निश्चित करून या दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले.