राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेचा निकाल जाहीर; प्रशांत घोणे, नीरज शाहू प्रथम

    सातारा : पुण्यशील सुमित्राराजे भोसले सांस्कृतिक ट्रस्ट आणि सातारकर रंगकर्मी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन एक मिनिट विनोदी मोनोलॉग (एकपात्री) स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. छोट्या गटात साताऱ्याचा देवदत्त प्रशांत घोणे आणि मोठ्या गटात परभणीचे नीरज शाहू यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर संध्या लिमये स्मृती प्रित्यर्थ लक्षवेधी स्त्री अभिनेत्रीचा किताब मोठ्या गटात मंजिरी मोघे आणि छोट्या गटात साक्षी पलंगे यांनी पटकावला.

    कोरोनाच्या या खडतर काळात कलावंत मंडळींच्या आयुष्यातला ताण थोडा कमी व्हावा आणि त्यांच्या कलागुणांना संधी मिळावी या उद्देशाने सातारकर रंगकर्मी आणि पुण्यशील सुमित्राराजे भोसले सांस्कृतिक ट्रस्ट या संस्थेने मिळून या विनोदी ऑनलाइन एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद लाभला. मोठ्या गटात एकूण ५६ स्पर्धक तर छोट्या गटात एकूण ३२ स्पर्धक असे एकूण ८८ स्पर्धक यात स्पर्धेत सहभागी झाले.

    यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, अहमदनगर, अकोला, परभणी, बीड, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, गडहिंग्लज, कोल्हापूर तसेच सातारा जिल्ह्यातील स्पर्धकही सहभागी झाले. या स्पर्धेत स्पर्धक संख्या जास्त झाल्यामुळे दोन्ही गटांसाठी आधी जाहीर केल्याप्रमाणे प्रथम तीन व वाढीव दोन अशी अनुक्रमे एक हजार, सातशे, पाचशे, तीनशे व दोनशे अशी पारितोषिक आहेत. यातून कलावंत मंडळींना काही प्रमाणात मदत होणार आहे. सोबतच विजेत्यांना आणि सहभागी स्पर्धकांना ऑनलाइन प्रशस्तीपत्र मिळणार आहेत. स्पर्धेचे परीक्षण मकरंद गोसावी आणि जगदीश पवार या मान्यवरांनी केले.

    स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे –

    छोटा गट

    देवदत्त प्रशांत घोणे, सातारा (पहिला) अथर्व दिनेश खोडके, कल्याण (दुसरा)
    कुमारी ईश्वरी नामदेव निकम, औरंगाबाद(तिसरा) कु. सुमेधा विलसिनी समीर चौधरी, ठाणे (चौथा), पियुष पांडुरंग काकडे, मिरज (पाचवा), कु. नेहल योगेश जोशी, नगर (उत्तेजनार्थ पहिला), कु. अनुश्री शिरीष गोळवलकर, सोलापूर(उत्तेजनार्थ दुसरा), कु. धनिष्ठा काटकर, सातारा (उत्तेजनार्थ तिसरा), श्रेयस वाठारकर, दौंड(उत्तेजनार्थ चवथा), कु आर्या अमित करंटे, सोलापूर(उत्तेजनार्थ पाचवा), कु. समृद्धी किरण स्वाती दामले, डोंबिवली (उत्तेजनार्थ सहावा), कु. भूमी हिरेमठ, गडहिंग्लज (उत्तेजनार्थ सातवा)

    मोठा गट

    नीरज शाहू, परभणी (पहिला), किरण आवळे, सातारा (दुसरा), स्नेहल कहाळे, अकोले (तिसरा), प्रमोद फडतरे, कोल्हापूर (चवथा), कु. तन्वी हेरंब ठाकूर, पुणे (पाचवा), प्रमोद पुजारी, कोल्हापूर (उत्तेजनार्थ पहिला), कु. स्नेहा अशोक धडवई, सातारा (उत्तेजनार्थ दुसरा), कु. अंकिता आनंदा दणाणे, सातारा (उत्तेजनार्थ तिसरा), करिश्मा मुलानी, इचलकरंजी (उत्तेजनार्थ चवथा), रतन लिंबेकर, परभणी (उत्तेजनार्थ पाचवा) ईशान केसकर, सातारा (उत्तेजनार्थ सहावा), स्मिता जोगळेकर, नाशिक (उत्तेजनार्थ सातवा)

    जयेंद्र चव्हाण, राजेश मोरे, बाळकृष्ण शिंदे, प्रसाद नारकर, जमीर आतार, रश्मी साळवी, पंकज काळे आदी मान्यवरांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले.