मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा कोयनानगरमधून रिव्हर्स गेअर

मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज २६ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार होते तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधणार होते.

    कोयनानगरमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा दृष्यमानतेवर परिणाम झाल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सातारा जिल्ह्याचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्याहून हेलिकॉप्टरने साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर कोयनानगरमधून पुन्हा पुण्याच्या दिशेने वळवण्यात आलं आहे.

    मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज २६ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार होते तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधणार होते.

    सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना झाल्या आहेत.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजीत दौऱ्यानुसार ते सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगर कडे हेलिकॉप्टरने रवाना झाले. दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून मुख्यमंत्र्यांचे ११.३० वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन होणार होते. नंतर  ११.४० वाजता ते कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देतील व पूरग्रस्तांची विचारपूस करतील. दुपारी १२.१५ वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेणार होते, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली होती. दुपारी १.२५ वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना होतील. असा नियोजीत दौरा होता.