लेह-लडाख सीमेवर कर्तव्य बजावताना सचिन जाधव यांना वीरमरण

पाटण (Patan) तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव (Sachin Jadhav ) यांना लेह-लडाख सीमेवर ( Leh-Ladakh border) कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. तसेच त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावाकडे आणलं गेलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सचिन जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सातारा : पाटण (Patan) तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव (Sachin Jadhav ) यांना लेह-लडाख सीमेवर ( Leh-Ladakh border) कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. तसेच त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावाकडे आणलं गेलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सचिन जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलं. त्यांच्या शौर्याला वंदन करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! जाधव कुटुंबीय आणि दुसाळे ग्रामस्थांच्या दुःखात महाराष्ट्रासह संपूर्ण देश सहभागी आहे, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.

भारत-चीन तणाव :

शहीद जवान सचिन जाधव हे तीन महिन्यांपूर्वी दोन महिन्यांच्या सुट्टीसाठी गावी आले होते. मात्र भारत-चीन तणाव वाढत असल्यामुळे त्यांची एक महिन्याची सुट्टी रद्द करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीच येऊन गेलेल्या सचिन यांच्या अशा जाण्याने सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लष्करी सेवेत जाण्याची त्यांची जबरदस्त ओढ :

सचिन जाधव यांचे प्राथमिक शिक्षण दुसाळे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण मिलिटरी अपशिंगे येथील शाळेत झाले होते. त्या काळात त्यांचे वास्तव्य त्यांच्या मावशीकडे होते. त्यांनी पदवीचे शिक्षण साताऱ्यातील शिवाजी कॉलेजमधून घेतले होते. लष्करी सेवेत जाण्याची जबरदस्त ओढ त्यांना होती. ते २००५ मध्ये बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये दाखल झाले होते. ते नाईक पदावर होते. भारत-चीन सीमेवर लेह येथील निमो या दुर्गम सेक्ट रमध्ये ते सेवा बजावत होते.