Sakal Maratha Samaj and Mumbai Maratha Kranti Morcha coordinators invite BJP MP Chhatrapati Udayanraje Bhosle to a statewide meeting

सातारा : सकल मराठा समाज आणि मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांना राज्यव्यापी बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. २० डिसेंबर रोजी मुंबईत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उदयराजेंची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या पुढच्या वाटचालीचे नियोजन करण्यासाठी मुंबईत राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या पाश्वभूमीवर सकल मराठा समाज, मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात भेट घेतली. तसेच त्यांना या बैठकीसाठी निमंत्रण दिले. मुंबईतील वडाळा येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सहकार नगर येथे ही बैठक होणार आहे.
या भेटीवेळी समन्वय समितीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना तलवार भेट देण्यात आली. उदयनराजेंनी या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

उदयनराजे यांनी बैठकीला उपस्थित राहू, असे आश्वासन दिल्याचे समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगीतले.