संभाजी भिडेसह ८० कराडमध्ये गुन्हा दाखल ; बंडातात्या कराडकरांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्या प्रकरणी पोलिसांची कारवाई

आषाढी वारीसाठीही सरकारच्या वतीने नियमावली जारी करण्यात आली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. अशातच हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

    सातारा: पायीवारीची मागणी करत आळंदीत आंदोलनाचा प्रयत्न करत असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बंडातात्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ संभाजी भिडे यांनी काल(सोमवारी) कराडमध्ये मोर्चा काढला होता. याप्रकरणी कराड पोलिसांनी ८० जणांवर गुन्हा दाखल केले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग आणि १४४ कलमांतर्गत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कराडमधील छत्रपती शिवाजी चौकात सर्व कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा थेट तहसिलदार कार्यालयात जाऊन धडकला आणि तिथे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले होते. तसेच तेथील एका मंदिराचा दरवाजा उघण्यास भाग पाडले आणि त्यांनी त्या मंदिरात प्रवेशही केला. याच पार्श्वभूमीवर करड पोलीस ठाण्यात संभाजी भिडे आणि त्यांच्यासोबत मोर्चामध्ये सहभागी असलेल्या ८० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नसून सोमवारी संध्याकाळी उशीरा हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

    कोरोनाची तिसरी निर्माण होण्याचाहा धोका सातत्याने लाट महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच अनेक धार्मिक सण उत्सव गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना सावटात पार पडणार आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारच्या वतीने नियमावली जारी करण्यात आली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. अशातच हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.