Same to everyone: Anil Ambani's tour with his family at Mahabaleshwar Golf Ground in Lockdown; Seal the grounds from the administration

प्रसिदध् उद्योगपती अनिल अंबानी सध्या महाबळेश्वरमध्ये आहेत. मागील काही दविसांपासून ते पत्नी टीना अंबानी आणि दोन मुलांसह गोल्फ कोर्समध्ये फिरायला येत होते. ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गोल्फ ग्राऊंड सील करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे, आणि महत्त्वाच्या कारणांशिवाय प्रवासालाही बंदी करण्यात आलेली आहे.

    सातारा : प्रसिदध् उद्योगपती अनिल अंबानी सध्या महाबळेश्वरमध्ये आहेत. मागील काही दविसांपासून ते पत्नी टीना अंबानी आणि दोन मुलांसह गोल्फ कोर्समध्ये फिरायला येत होते. ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गोल्फ ग्राऊंड सील करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे, आणि महत्त्वाच्या कारणांशिवाय प्रवासालाही बंदी करण्यात आलेली आहे.

    अनिल अंबानी आणि त्यांचा परिवार गेल्या १५ दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये वास्तव्याला आहेत. डायमंड किंग अशी ओळख असलेल्या अनुप मेहता यांच्या बंगल्यात त्यांचा सध्या मुक्काम आहे. अंबानी परिवार गेल्या काही दिवसांपासून गोल्फ ग्राऊंडमध्ये फिरायला येत होते. हे सर्वांना समजल्यानंतर, इतरही काही स्थानिक मंडळी इथे येऊ लागली. त्यामुळे गर्दी वाढू लागली होती.

    या प्रकरणाची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळी, त्यानंतर महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील यांनी गोल्फ गराऊंडच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली. या गर्दीला कोण जबाबदार आहे? आणि ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काय करण्यात आले? असे विचारणा या नोटिशीत करण्यात आली होती. याचे योग्य उत्तर न मिळाल्याने सोमवारी हे ग्राऊंड अखेर सील करण्यात आले आहे.

    महाबळेश्वरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे त्यामुळे प्रशासनावर दबाव आहे. या प्रकरणात काही स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचीही माहिती आहे.

    महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात अनेक बडे उद्योगपती आणि सेलिब्रिंटीचे बंगले आणि फार्महाऊस आहेत. ही मंडळी अनेकदा सुट्ट्यांसाठी इथे येतात. काही सिनेमांचे शूटिंगही या परिसरात होत असते. मुकेश आणि अनिल अंबानीही इथे येत जात असतात. मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडाही इथेच झाला होता.