Satara bullock cart race organized; 30 charged

आठवडा भरात बैलगाडी शर्यतीवरील दुसरी कारवाई पोलिसांनी केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिस यांची संयुक्त कारवाई केली असुन पुसेगाव पोलिस याचा तपास करत आहेत.

    सातारा : जिल्हयातील खटाव तालुक्यात ललगुण येथे अवैध बैलगाडी शर्यती भरविल्या प्रकरणी 30 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी बैल, छकडे, दुचाकीसह काही रोख रक्कम असा 5 लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

    आठवडा भरात बैलगाडी शर्यतीवरील दुसरी कारवाई पोलिसांनी केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिस यांची संयुक्त कारवाई केली असुन पुसेगाव पोलिस याचा तपास करत आहेत.

    सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीवर बंदी घातल्यापासून राज्यातील बैलगाडी शर्यती बंद आहेत. शर्यतप्रेमींकडून ही बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी लपूनछपून बैलगाडा शर्यतीचं आयोजन केले जात असल्याचं पाहायला मिळते.