पश्चिम बंगाल मधील भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा साताऱ्यात निषेध ; सातारा जिल्हा भाजपचे प्रशासनाला निवेदन

राज्यात सूडाचे राजकारण सुरु झाल्याचा आरोप भाजपने केला आहे . या प्रकरणाचा निषेध म्हणून भाजप च्या वतीने ठिकठिकाणी निषेध सत्र सुरु आहे . साताऱ्यात ही या प्रकरणाकडे जिल्हा भाजप कार्यकारिणीने निषेध आंदोलन करून लक्ष वेधले. जिल्हा प्रशासनाने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या भावना केंद्र शासनाला कळवाव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे .

    सातारा : पश्चिम बंगालच्या विधान सभा निवडणूकीनंतर तेथे भाजपच्या कार्यकर्त्यांवर तीव्र हल्ले सुरु झाले आहेत . या हल्ल्यांचा निषेध बुधवारी साताऱ्यात सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आला .

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर , शहराध्यक्ष विकास गोसावी , जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांच्या उपस्थितीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या निषेध फलक दर्शविण्यात आले . भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने प्रशासनाला या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केंद्र सरकार कडे करावी असे निवेदनात नमूद आहे . निवेदनात पुढे म्हणले आहे की पं बंगालमध्ये तृणमूल च्या समर्थकांनी जबरदस्त हिंसाचार सुरु केला असून भाजपच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत . राज्यात सूडाचे राजकारण सुरु झाल्याचा आरोप भाजपने केला आहे . या प्रकरणाचा निषेध म्हणून भाजप च्या वतीने ठिकठिकाणी निषेध सत्र सुरु आहे . साताऱ्यात ही या प्रकरणाकडे जिल्हा भाजप कार्यकारिणीने निषेध आंदोलन करून लक्ष वेधले. जिल्हा प्रशासनाने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या भावना केंद्र शासनाला कळवाव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे .