सातारा जिल्हा बँकेची निवडणुक; उदयनराजे राष्ट्रवादीकडे मागणार तीन जागा

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; पण त्यांनी जिल्हा बँकेत पक्ष व राजकारणविरहित राहावी, अशी भूमिका घेत राष्ट्रवादीकडे संचालकांच्या तीन जागांची मागणी करणार आहेत. येत्या शुक्रवारी होणाऱ्या बँकेच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर बँकेच्या निवडणुकीबाबत सर्व नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. यामध्ये उदयनराजे भोसले या जागांची मागणी करणार आहेत.

    सातारा : भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; पण त्यांनी जिल्हा बँकेत पक्ष व राजकारणविरहित राहावी, अशी भूमिका घेत राष्ट्रवादीकडे संचालकांच्या तीन जागांची मागणी करणार आहेत. येत्या शुक्रवारी होणाऱ्या बँकेच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर बँकेच्या निवडणुकीबाबत सर्व नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. यामध्ये उदयनराजे भोसले या जागांची मागणी करणार आहेत.

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे मागणी करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व प्रक्रियेत भोसले यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांच्यापुढे दोन पर्याय होते. एकतर भाजपसोबत राहून त्यांच्या पॅनेलमध्ये सहभागी होणे किंवा राष्ट्रवादीच्या सर्वसमावेश पॅनेलमध्ये सहभागी होऊन आपली जागा फिक्स करणे असे होते.

    पण उदयनराजेंनी जिल्हा बॅंकेची निवडणूक पहिल्यापासून सावधगिरीने घेण्याची तयारी केली आहे. मागील निवडणुकीत ते गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा मतदारसंघातून निवडून आले होते. एका निवडणुकीत त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा याच मतदारसंघातून पराभव केला होता. आताची निवडणूक ही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.