विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघे अटकेत; दोन गावठी पिस्टल जप्त

विनापरवाना शस्र बाळगल्याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका सराईत गुन्हेगारासह तडीपार संशयिताला कराड तालुक्यातील शिरवडे हद्दीत शहापूर ते तासवडे टोलनाका जाणाऱ्या रस्त्यावर अटक (Satara Police Action) केली.

    सातारा : विनापरवाना शस्र बाळगल्याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका सराईत गुन्हेगारासह तडीपार संशयिताला कराड तालुक्यातील शिरवडे हद्दीत शहापूर ते तासवडे टोलनाका जाणाऱ्या रस्त्यावर अटक (Satara Police Action) केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास  झाली.

    अमित हणमंत कदम (रा. अंतवडी, ता. कराड) आणि अल्तमेश ऊर्फ मोन्या हारून तांबोळी (रा. मंगळवार पेठ, कराड) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. यापैकी अमित हा तडीपार तर अल्तमेश ऊर्फ मोन्या सराईत आहे.

    या कारवाईत एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहायक फौजदार उत्तम दबडे, हवालदार अतिष दबडे, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, मंगेश महाडीक, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, प्रवीण कांबळे, मयूर देशमुख, मोहसिन मोमीन, प्रवीण पवार, विशाल पवार, रोहीत निकम, सचिन ससाणे, केतन शिंदे, वैभव सावंत आदी सहभागी झाले होते.