साताऱ्यात कोरोनाचा संसर्ग तुटता तुटेना : ‘ब्रेक द चेन’ साठी १५२ कंटेन्मेंट झोनमध्ये पालिकेकडून सॅनिटायझेशनला गती

खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार आम्ही गेल्या चार दिवसापासून सातारा शहर सॅनिटाईज करत असून कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात कसा रोखता येईल याचे नियोजन सुरू असल्याचे मनोज शेंडे यांनी सांगत होम टू होम सर्वेसाठी चाळीस शिक्षक व आरोग्य विभागाचे दहा असे पन्नास कर्मचारी प्रत्यक्ष फील्डवर असल्याचे स्पष्ट केले . कोरोना लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शहरात ठिकठिकाणी पुन्हा रिक्षा फिरविली जाणार आहे. 

    सातारा : सातारा शहरात कोरोनाचे वाढते संक्रमण थोपविण्यासाठी सातारा पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे .१५२ कंटेन्मेंट झोनमध्ये तब्बल १५५४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत . या झोनसह शहराचा प्रत्येक वॉर्ड निर्जंतुक करण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजीत बापट ही जोडगोळी यंत्रणेच्या सज्जते सह रस्त्यावर उतरली आहे .

    खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरासह हद्दवाडीतील संपूर्ण भाग पूर्ण सॅनिटाईज व फॉगिंग मशीन ने स्वच्छ करण्याच्या सूचना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिल्या होत्या . शेंडे यांनी यंत्रणा गतिमान करून पहिल्या टप्प्यात तब्बल चार प्रभाग व बावीस कंटेन्मेंट झोन सॅनिटाईज करून कामाचा धडाका उडवून दिला . सातारा शहरात १५२ कंटेन्मेंट झोनमध्ये १५५४ रुग्ण कोविड बाधित असून ते घरातून उपचार घेत आहेत . सातारा शहराचा पॉझिटिव्हिटी रेट १६.७९ टक्क्यावर पोहचला आहे . आत्तापर्यंत साताऱ्यात आत्तापर्यंत ९१०० रूग्णांना बाधा झाल्याचे कोविड कक्ष प्रमुख प्रणव पवार यांनी सांगितले .क रोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १४.८५टक्के आहे .मात्र करोना रुग्णांची संख्या घटण्याच नाव घेईना झाली आहे . त्यामुळे पालिकेने ट्रेसिंग ट्रिटमेंट या गोष्टींवर भर दिला आहे .

    सातारा पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण सातारा शहर तसेच हद्दवाडीतील संपूर्ण एरिया हा सॅनिटाईज करून फॉगिंग मशीनच्या द्वारे स्वच्छ करणार असून प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक२० हा भाग सॅनिटाईज होणार असून प्रभाग क्रमांक २० ते प्रभाग क्रमांक १ असा एरिया फॉगिंग मशीन ने फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली .