मुख्याध्यापक नेमणुकीत ‘शाळा’ ; पालिका शिक्षण मंडळात रोस्टर डावलल्याचा आरोप

सातारा शहरात पालिका शिक्षण मंडळाच्या १८ शाळा असून त्यामध्ये ९२ यामध्ये तीन उर्दू माध्यम आहेत. यापैकी मराठी माध्यम पाच शाळा वरिष्ठ मुख्याध्यापक पात्र शाळा आहेत. तर उर्वरित दहा शाळा या मुख्याध्यापक पात्र नाहीत. त्यामुळे या शाळांचे प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी सर्वसाधारण सेवाज्येष्ठता यादी तयार करून सेवाजेष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकाचा पदभार सोपविण्यात यावा, असा शासन निर्णय आहे.

    सातारा : सेवाज्येेष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकपदाचा पदभार सोपविणे अपेक्षित असताना सातारा पालिकेच्या काही शाळांमध्ये या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. १८ पैकी ५ शाळांच्या मुख्याध्यापकपदाची सूत्रे कनिष्ठ शिक्षकांच्या हाती सोपविली गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिक्षकांच्या या ‘शाळे’बाबत राष्ट्रीय रोस्टर हक्क-अधिकार न्याय संघटनेने पालिका प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही केली आहे.

     नियमांचे उल्लंघन करून निवड
    सातारा शहरात पालिका शिक्षण मंडळाच्या १८ शाळा असून त्यामध्ये ९२ यामध्ये तीन उर्दू माध्यम आहेत. यापैकी मराठी माध्यम पाच शाळा वरिष्ठ मुख्याध्यापक पात्र शाळा आहेत. तर उर्वरित दहा शाळा या मुख्याध्यापक पात्र नाहीत. त्यामुळे या शाळांचे प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी सर्वसाधारण सेवाज्येष्ठता यादी तयार करून सेवाजेष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकाचा पदभार सोपविण्यात यावा, असा शासन निर्णय आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने तयार केलेल्या सेवाज्येष्ठता यादीनुसार ज्या त्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकपदाची सूत्रे सोपविणे क्रमप्राप्त आहे. मात्र पालिकेच्या पाच शाळांमध्ये शासन नियमांचे उल्लंघन करून कनिष्ठ शिक्षकांची मुख्याध्यापकपदी निवड करण्यात आली आहे.

     पात्र शिक्षकाकडे मुख्याध्यापकपदाची सूत्रे द्या
    सध्या शरद बेस्के, सुनील तुपे, संजय वेदांते, किशोर शिंदे व संगीता दिरांगणे या शिक्षकांकडे ही जबाबदारी असून सेवा ज्येष्ठता यादी डावलून या निवडी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रीय रोस्टर हक्क-अधिकार, न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप फणसे यांनी केला आहे. याबाबत पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मारुती भांगे यांना संघटनेने निवेदन दिले असून, नियमबाह्य करण्यात आलेल्या निवडी रद्द करून वरिष्ठ व पात्र शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाची सूत्रे द्यावीत, अशी मागणी केली आहे.