धक्कादायक! वेळे गावात १७ वर्षीय तरुणीचा विश्वासघात करून विनयभंग  ; आरोपीला अटक

वेळे ता. वाई येथे संतोष निवृत्ती पवार वय ४० हा पीडित तरुणीच्या घराशेजारी राहण्यास असून त्याची १७ वर्षीय मुलगी पीडित मुलगी च्या सोबत खंडाळा तालुक्यातील एका नामांकित विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे.

    भुईंज  : वेळे ता. वाई येथील बामनकी नावाच्या शिवारात संतोष निवृत्ती पवार या ४० वर्षीय पुरुषाने एका शेजारीच राहणाऱ्या १७ वर्षीय शालेय शिक्षण घेत असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने वेळे गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून त्याला गजाआड केले आहे.

    वेळे ता. वाई येथे संतोष निवृत्ती पवार वय ४० हा पीडित तरुणीच्या घराशेजारी राहण्यास असून त्याची १७ वर्षीय मुलगी पीडित मुलगी च्या सोबत खंडाळा तालुक्यातील एका नामांकित विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे त्यामुळे आरोपी संतोष पवार याचे आणि पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे घरगुती संबंध असल्यामुळे सर्व सदस्यांचा संतोष पवार वर मोठा विश्वास होतात या विश्वासाचा गैरफायदा घेऊन संतोष पवार ने दि.११ मार्च रोजी स्वतःच्या मोबाईल वरून पीडित तरुणीला फोन करून सांगितले की माझ्या मुली विषयी तुझ्याशी खूप खाजगी बोलायचे आहे आम्ही सर्वजण बामन की नावच्या शिवारातील स्वतःच्या शेतामध्ये आहोत तेथे तू ये पीडित मुलगी संतोष पवार वर विश्वास ठेवून ती एकटीच बामन की नावाच्या शिवारात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संतोष पवार च्या बोलण्यावर दोन वाजता पोहोचली त्यावेळी त्या ठिकाणी आरोपीच्या घरातील इतर कोणीही सदस्य उपस्थित नव्हते सुरुवातीला त्यानी बनवाबनवी करून स्वतःच्या मुली विषयी काहीतरी माहिती विचारण्यास सुरुवात केली असा खोटा बनाव करून आणि क्षणार्धात पीडित मुलीचा हात धरून तू मला खूप आवडतेस असे सांगून तिला मिठी मारून स्वतःच्या अंगावर वडून घेऊन मला किस दे असे मनाला लज्जा उत्पन्न होणारे वाईट कृत्य केल्याने पीडित तरुणी घाबरुन जाऊन तीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि घाबरलेल्या अवस्थेत ती स्वतःच्या घरी पोहोचली त्यानंतर तिने घडल्या प्रकाराची माहिती सकाळीच शेतात गेलेल्या आई-वडिलांना घडल्या प्रकाराची माहिती देऊन तिने ताबडतोब घरी येण्याचे सांगितल्यावरून आई वडील घरी आले त्यावेळी भीतीपोटी रडत बसलेल्या मुलीने घडल्या प्रकाराची माहिती दिली ही बाब गंभीर असल्याने व आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने भुईंज पोलिस स्टेशन गाठले व तेथील सपोनि आशिष कांबळे यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली ही बाब गंभीर असल्याने त्यांनीदेखील संतोष निवृत्ती पवार वय 40 राहणार वेळे तालुका वाई याच्यावर तात्काळ विनयभंगाचा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. वेळे गावांमध्ये घडलेल्या या अमानुस घटनेमुळे तरुणीसह महिला वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता असे दृष्ट कृत्ये करणाऱ्या लोकांवर गाव कारभारी आणि सर्वच राजकीय पक्ष्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी अशा वाईट घटना आपल्या गावात घडू नयेत यासाठी पुढाकार घेऊन गावातील तरुणींसह महिला वर्गाच्या संरक्षणासाठी पुढे येऊन महिलावर्गाची धोक्यात आलेली सुरक्षितता आभाधीत राखण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी वाई तालुक्यातील जनतेतून होत आहे.