वीर धरण परिसरात अज्ञात लुटमार करणाऱ्या टोळीचा शिरवळ पोलिसांकडून पर्दाफाश ; सहा आरोपी ताब्यात घेवून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

शिरवळ पोलीस ठाण्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की वीर धरण परिसरामध्ये प्रेमी युगुलांसह सुट्टीमध्ये पर्यटनासाठी नीरा नदीच्या किनारी फिरावयास आलेल्या नागरिकांना कुकरी व चाकूसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करत असलेल्या अंतरजिल्हा टोळीतील सहाजणांना शिरवळ पोलिसांनी चितथरारक पाठलाग करून गजाआड करण्यात यश आले आहे.लुटमारीच्या पार्श्वभूमीवर वीर धरण परिसरात शिरवळ पोलिसांच्याकडून गस्त घालत असताना संशयित रित्या दुचाकीवर फिरणा-या युवकांना पोलिसांनी हटकले असता संबंधितानी तेथून पळ काढला .

    वाई : प्रेमी युगुलांसह वीर धरण परिसरामध्ये फिरायला आलेल्या नागरिकांना आणि पर्यटकांना भर दिवसा हत्यारांचा धाक दाखवून संबंधित मुलीस व महिलेस दमदाटी करून दागिन्यांसह मोबाईलची लुटमार केलेल्या अंतरजिल्हा टोळीला शिरवळ पोलिसांनी चित्तथरारक पाठलाग करून अटक केल्याने परिसरातील व जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी शिरवळ पोलीस ठाण्याचे अभिनंदन केले आहे. असाच एक प्रकार दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मुसक्या आवळून अटक केल्याने पूर्वी शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल असलेला दरोड्याचा गुन्हा शिरवळ पोलिसांनी आज उघडकीस आणला आहे.

    शिरवळ पोलीस ठाण्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की वीर धरण परिसरामध्ये प्रेमी युगुलांसह सुट्टीमध्ये पर्यटनासाठी नीरा नदीच्या किनारी फिरावयास आलेल्या नागरिकांना कुकरी व चाकूसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करत असलेल्या अंतरजिल्हा टोळीतील सहाजणांना शिरवळ पोलिसांनी चितथरारक पाठलाग करून गजाआड करण्यात यश आले आहे.लुटमारीच्या पार्श्वभूमीवर वीर धरण परिसरात शिरवळ पोलिसांच्याकडून गस्त घालत असताना संशयित रित्या दुचाकीवर फिरणा-या युवकांना पोलिसांनी हटकले असता संबंधितानी तेथून पळ काढला . यावेळी शिरवळ पोलिसांनी पळून जात असलेल्या दुचाकीचा पाठलाग करीत सराईत गुन्हेगारांना अखेर ताब्यात घेतले असता संशयित युवक हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खंडाळा तालुक्यातील शिरवळ जवळील वीर धरण परिसर हा अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिकदृष्ट्या पर्यटनाचे नवीन केंद्र उदयास येत आहे. हा परिसर संपूर्ण जलाशयाचा असून शांत व निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटक येथे येत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी पर्यटकांना आलेल्या तसेच प्रेमी युगुलांना या संशयितांना कुकरी व चाकूच्या धाकाने लुटल्याच्या घटना घडल्या असून याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झालेली आहे. या घडणा-या घटनांना आवर घालण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी भरडे यांच्या आदेशामुळे अश्या घटनांना थोपविण्यासाठी व यातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस अंमलदार रवींद्र कदम, जितेंद्र शिंदे, धीरज यादव, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड यांचे पथक वीर धरण परिसरात गस्त घालत असताना परिसरामध्ये मास्क लावलेल्या अवस्थेत दुचाकीवर संशयित रित्या युवक फिरत असताना आढळून आले . या पथकाने यावेळी हटकले असता त्यांनी त्या ठिकाणावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याचवेळेस शिरवळ पोलिसांनी त्यांचा चित्तथरारक पाठलाग करीत बिना नंबरप्लेटच्या दुचाकीवरील आरोपी महादेव सुख्वीर खोमणे वय २३, रा. चंद्र्पुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर, शाहरुख महमुलाल बक्शी वय २४, रा. मार्डी, ता. माण सध्या रा. चंद्र्पुरी, ता. माळशिरस जि. सोलापूर तसेच भैया हुसेन शेख वय २५, रा. कांबळेश्वर ता. बारामती, जि. पुणे व १७ वर्षीय अल्पवयीन तरुण अश्या चौघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे १३ इंच लांबीची कुकरी , ७.५ इंचाचा नक्षीदार चाकू अशी घातक हत्यारे सापडली तर इतर दोघांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला असता लोणंदजवळ फलटण उपविभागाचे पोलीस अधिकारी तानाजी भरडे यांनी लोणंद येथे मोठ्या शिताफीने अमीर मौलाली मुल्ला वय २१, रा. चंद्र्पुरी ता. माळशिरस व मयूर अंकुश कारंडे वय २० रा. तावशी ता. इंदापूर जि. पुणे यांना ताब्यात घेवून शिरवळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यावेळी महावीर खोमणे याच्या ताब्यातून १३ इंच लांबीची कुकरी, मोबाईल, नंबरप्लेट नसलेली ८०००० रुपये किमतीची दुचाकी, शाहरुख बक्शी याच्या ताब्यातून ७.५ इंचाचा नक्षीदार व दुधारी चाकू , मोबाईल व नंबरप्लेट उलटी लावलेली ५००००० रुपये किमतीची दुचाकी क्रमांक MH४२ AV ०८४२ असा एकूण अंदाजे १,५६,००० रुपयांचा मुद्देमाल शिरवळ पोलिसांनी जप्त केला आहे. तपासादरम्यान शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील दरोडा व दरोड्याच्या प्रयत्नांचे गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दात शक्यता निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे वीर धरण परिसरामध्ये मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या भोर येथील युवकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकत रोख रक्कम १०,००० व मोबाईल असा ऐवज नेणा-या टोळीचा गुन्हा उघडकीस आणण्यास शिरवळ पोलिसांना यश आले असून आरोपींकडून ३५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात यास आले आहे. याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सागर आरगडे तपास करीत आहे.