“तुम्ही लोळा ……. पण नगरपालिका लोळवू नका” ; शिवेंद्रसिंहराजे यांचा उदयनराजे यांच्यावर पलटवार

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली ते म्हणाले, " सातारा पालिकेची सत्ता पाच वर्ष खासदार गटाकडे होती. त्यांच्याकडून पाच वर्ष कोणतेही उठावदार काम झालेले नाही या मतावर मी ठाम आहे, केवळ मी मिशा काढीनं भुवयां काढीनं या वल्गना म्हणजे करायचं काहीच नाही, मूळ मुद्याला बगलं देऊन वेळ मारून न्यायची याची सातारकरांना चांगलीचं सवय आहे. मला पेट्रोल परवडत नाही म्हणून मी दुचाकीवरून गेलो असे असेल तर हेच खासदार दुसरीकडे ऐंशी लाखाची नवी कोरी बीएमडब्लू खरेदी करतात.

    सातारा : साताऱ्यात कोणी कुठे कसं जायच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मी लोळत जाईन वगैरे म्हणणाऱ्या खासदारांनी काहीही करावे माझी ना नाही, त्यांनी शहराची मातृसंस्था असणाऱ्या नगरपालिकेला मात्र त्यांनी लोळवू नये, केवळ वेळ मारून नेण्यासाठी मुद्याला बगल द्यायची ही त्यांची सवय आहे असा जोरदार पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर केला.

    येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत उदयनराजे यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली ते म्हणाले, ” सातारा पालिकेची सत्ता पाच वर्ष खासदार गटाकडे होती. त्यांच्याकडून पाच वर्ष कोणतेही उठावदार काम झालेले नाही या मतावर मी ठाम आहे, केवळ मी मिशा काढीनं भुवयां काढीनं या वल्गना म्हणजे करायचं काहीच नाही, मूळ मुद्याला बगलं देऊन वेळ मारून न्यायची याची सातारकरांना चांगलीचं सवय आहे. मला पेट्रोल परवडत नाही म्हणून मी दुचाकीवरून गेलो असे असेल तर हेच खासदार दुसरीकडे ऐंशी लाखाची नवी कोरी बीएमडब्लू खरेदी करतात. ते म्हणतात माझा कॉमनसेन्स कमी आहे मग पेट्रोल न परवडणारे खासदार नवी गाडी कशी चालवणार हे समजायला मार्ग नाही. पाच वर्ष सातारकरांनी सत्ता दिली आता हे म्हणतात मी लोळत जाईल कसाही जाईल, त्यांनी खुशाल काही करावे पण सातारा पालिका मात्र लोळवू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. कोविडच्या काळात सातारा पालिका मात्र अत्यंत सुस्त होती. करोनाचा मार सातारकरांनी झेलला मात्र सत्ताधाऱ्यांनी काहीच केले नाही, मग जर काहीच केले नाही तर केवळ लक्ष वळविण्यासाठी ही वक्तव्ये केली जात आहेत. खासदार म्हणतात हिंमत असेल तर समोरासमोर या पण मला कळत नाही, समोरासमोर येऊन करायचे काय? खासदार जिल्हा बँकेच्या मिटिंगला पहिल्यांदाच आले होते जर बोलायचे होते तर त्यांनी विषय काढायला हवा होता. जर साताऱ्यात चुकतय तर त्यावर बोलायला पाहिजे आम्ही चुकीचे बोललो असतो तर सातारकरांनी आम्हाला गप्प केले असते. जर भविष्यातील साताऱ्यासाठी उदयनराजे जर काही करणार असतील तर त्यांनी आनेवाडी व खेड शिवापूर येथील टोल नाक्याची टोल माफी सातारकांसाठी करून द्यावी अशी अपेक्षा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली