धक्कादायक! महाबळेश्वर येथे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

वैदयकिय अधिकारी यांनी उपचारापूर्वीच अंकित मृत्यु पावला असल्याचे सांगितले अंकितच्या अकाली जाण्याने मांघर येथे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आकाश शिंदे याने महाबळेश्वर पोलिसांना खबरी जबाब दिला या जबाबा वरून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे या घटनेचा पुढील तपास महाबळेश्वर पोलिस करीत आहेत.

    महाबळेश्वर : मांघर ( ता महाबळेश्वर ) दहावीत शिकत असलेल्या अंकित विजय शिंदे या १६ वर्षाच्या मुलाने पाण्याची टाकी शिवारातील एका उंबराच्या झाडाला शनिवारी गळफास घेवुन आत्महत्या केली महाबळेश्वर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असुन पोलिस पुढील तपास करीत आहे.

    विजय गणपत शिंदे वय ४८ हे आपल्या कुटूंबा सोबत मांघर येथे राहातात त्यांना एक मुलगी व दोन मुले आहेत विजय शिंदे हे मोलमजुरी करून आपले कुटूंब चालवितात शनिवारी नेहमी प्रमाणे विजय शिंदे हे मोलमजुरीसाठी तळदेव येथे गेले तर त्यांचा एक मुलगा आकाश हा रानात जळण आणण्यासाठी गेला त्या मुळे शनिवारी विजय शिंदे यांची पत्नी व त्यांची मोठी मुलगी व दहावीत शिकत असलेला अंकित हे तिघेच घरी होते दुपारी जेव्हा आकाश रानातुन घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले की सकाळी तु गेल्यानंतर अंकित आपला मोबाईल घरी ठेवुन न जेवताच घरातुन निघुन गेला आहे बराच वेळ झाला तरी तो आला नाही आईने सांगितल्यामुळे आकाशने आपला अंकितचा शोध सुरू केला साडेचार वाजता पाण्याची टाकी या शिवारात आकाशला एका उंबराच्या झाडाला दोरीच्या मदतीने गळफास घेतलेल्या अवस्थेत अंकित आढळुन आला त्यांने घरी धावत जावुन या बाबतची माहीती आईला दिली.

    घटनेची माहीती त्यांनी पोलिसांना दिली त्याचप्रमाणे अंकितला त्यांनी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले तेथे कर्तव्यावर असलेले वैदयकिय अधिकारी यांनी उपचारापूर्वीच अंकित मृत्यु पावला असल्याचे सांगितले. अंकितच्या अकाली जाण्याने मांघर येथे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आकाश शिंदे याने महाबळेश्वर पोलिसांना खबरी जबाब दिला या जबाबा वरून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे या घटनेचा पुढील तपास महाबळेश्वर पोलिस करीत आहेत.