धक्कादायक! यवतेश्वरमध्ये मानवी कवटी आढळली

यवतेश्वर घाटात मानवी हाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्यास सुरूवात केली होती. यवतेश्वर घाटात निर्जनस्थळी कवटी, हाडे व इतर वस्तू पोलिसांना आढळून आल्या. दुपारी उशिरा पर्यंत पंचनामा सुरू हाेता. परिसराची पाहणी पोलिसांकडून केली जात होती.

    सातारा : सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटात मानवी कवटी, जळालेल्या अवस्थेत चप्पल सापडल्याने परिसर हादरून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घातापाताची शक्यता वर्तवली जात आहे. यवतेश्वर घाटात मानवी हाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्यास सुरूवात केली होती. यवतेश्वर घाटात निर्जनस्थळी कवटी, हाडे व इतर वस्तू पोलिसांना आढळून आल्या. दुपारी उशिरा पर्यंत पंचनामा सुरू हाेता. परिसराची पाहणी पोलिसांकडून केली जात होती. परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रसिध्द असणाऱ्या ठिकाणीवर सापडलेल्या मानवी कवटी, हाडे व जळलेल्या चप्पलमुळे परिसरात खळबळ उडाली. परिसरात अनेक ठिकाणी राख दिसत असून तेथे वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने पोलिस सर्व शक्यता तपासून पाहत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, असे सूत्रांनी सांगितले.