धक्कादायक! साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांसह त्याच्या आई-वडिलांना घाटातील जंगलात मारुन त्यांचे मृतदेह जावळी तालुक्यातील मार्ली घाटामध्ये फेकून देण्यात आले होते. हे मृत कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामनोली गावातील असल्याची माहिती समोर येते आहे.

साताऱ्यात (Satara) एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या (kill) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी (Police) मिळताच, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता पैशांच्या हव्यासापोटीच नराधमाने हे कृत्य केले असल्याचा पोलिसांना संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांसह त्याच्या आई-वडिलांना घाटातील जंगलात मारुन त्यांचे मृतदेह जावळी तालुक्यातील मार्ली घाटामध्ये फेकून देण्यात आले होते. हे मृत कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामनोली गावातील असल्याची माहिती समोर येते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृत व्यक्तींची नावे तानाजी विठोबा जाधव, पत्नी मंदाकिनी जाधव, मोठा मुलगा तुषार जाधव आणि छोटा मुलगा विशाल जाधव अशी आहेत. तसेच याप्रकरणी पोलिसांनी आरोपी योगेश निकमने या व्यक्तीला ताब्यात घेतले असून चौकशीदरम्यान आरोपीने हत्याची कबुली दिली आहे.

आरोपीने कशी केली हत्या ?

तुषार आणि विशाल जाधव या मुलांना लष्करात नोकरी लावतो असे आरोपी योगेश निकमने त्यांना सांगितले होते. त्यानुसार या मुलांना त्याने साताऱ्याला बोलावून घेतले. परंतु मार्ली घाटात लष्कराचे ट्रेनिंग सेंटर असून तेथे आपल्याला जायचे आहे असे त्यांना सांगून नेले. मात्र, त्यानंतर या दोघांनाही गुंगीचे औषध देवून उंच कड्यावरुन ढकलून दिले. आरोपीने दोन्ही मुलांना संपवल्यानंतर या मुलांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या आई -वडिलांशी संपर्क साधला आणि त्यांचीही अशाचप्रकारे हत्या केल्याची माहिती आरोपी योगेशने पोलिसांना दिली आहे.