धक्कादायक ! तीन बहिणींच्या मृत्यूने कराड हादरले ; अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज 

कराड : शहर परिसरातील खून सत्र थांबले असतानाच शहरा नजीकच्या सैदापूरात एका कुटुंबातील तीन चिमूकल्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने पुन्हा एखदा खळबळ उडाली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला तरी यामागे घातपाताचा संशय ही व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी बहिणींच्या मृत्यूने कराड पुन्हा एकदा हदरले असून मृत मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

कराड नजीकच्या सैदापूर येथे मिल्ट्री वस्तीगृह शेजारी शिवानंद सासवे आपल्या कूटूंबासह वास्तव्यास आहेत.गूरूवारी सायंकाळी कुटुंबातील सर्वांनी एकत्रित जेवण केले होते. मध्यरात्री तीन मुलींसह त्यांच्या आईस उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. सर्वांना तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

कृष्णा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सूरू असताना आस्था (वय ९), आयुशी (वय ३), आरुषी  (वय ८) रा. मिल्ट्री वस्तीगृह शेजारी, सैदापूर यांचा मृत्यू झाला. सबंधित घटनेची कराड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी दिलेली माहितीनूसार, शिवानंद सासवे आपल्या कूटूंबासह सैदापूर येथे राहतात. गूरूवारी सायंकाळी कुटुंबातील सर्वांनी एकत्रितपणे जेवण केले. मात्र मध्यरात्री एकच्या सुमारास शिवानंद यांची पत्नी आणि आरुषी, आस्था व आयुषी या तिन मुलींना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तिघींनाही उपचारासाठी कराड येथे कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सूरू असताना आस्था व आयुषी यांचा मृत्यू झाला. आरुषीवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिची प्रकृती सुधारत असतानाच आज सकाळी तिचाही मृत्यू झाला. मृत्यूचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.