धक्कादायक! वाळूच्या कारणावरून नरवणे येथे दोघांचा खून ; फक्त ३३ हजारांसाठी दोघांचा जीव गेला

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्यात व त्यांचे चुलत भाऊ विलास धोंडीबा जाधव यांच्या गटा मध्ये मारामारी झाली. चाकू व कुऱ्हाडीने मारहाण झाल्याने यात अनेक जण जखमी झाले. जबर जखमी झालेले चंद्रकांत नाथाजी जाधव विलास धोंडीबा जाधव यांना दहिवडी मध्ये ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

    दहिवडी : सातारा जिल्ह्यात आदर्श गाव ,तसेच एक गाव एक गणपती ,पाणी फाउंडेशन असे अनेक उपक्रम यशस्वी करणारे नरवणे तालुका माण या गावांमध्ये आज सकाळी अघटित घटना घडून आली. वाळूच्या लिलावाच्या कारणावरून दोन सख्खे चुलत भाऊ यांच्या दोन गटात सकाळी साडे दहा वाजता नरवणे ता माण येथे झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला.या खुनामुळे माण तालुका हादरला असून नरवणे येथे तणावाचे वातावरण आहे.

    याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, तहसीलदार माने यांनी नरवणे येथे जप्त केलेल्या वाळूचा लिलाव २२ फेब्रुवारी रोजी केला होता. पाच ब्रास वाळूचे चंद्रकांत जाधव यांनी ३३ हजार रुपये भरले होते. व लिलाव घेतला होता.दरम्यान विलास धोंडीबा जाधव यांनी तलाठ्याकडे चंद्रकांत नाथाजी जाधव यांच्या विरोधात तक्रार केली कि, ते बेकायदा वाळू उपसा करत आहेत . चंद्रकांत जाधव यांनी वाळू लिलाव घेतल्याचे सांगितले.त्यातूनच वाद वाढत गेला व आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्यात व त्यांचे चुलत भाऊ विलास धोंडीबा जाधव यांच्या गटामध्ये मारामारी झाली. चाकू व कुऱ्हाडीने मारहाण झाल्याने यात अनेक जण जखमी झाले. जबर जखमी झालेले चंद्रकांत नाथाजी जाधव विलास धोंडीबा जाधव यांना दहिवडी मध्ये ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

    मारामारीमध्ये अन्य जखमी झालेले सातारा येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेल्याचे समजते.दोन्ही कुटुंबातील फिर्यादिंचे जबाब घेण्याचे काम व गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू आहे. डी वाय एस पी निलेश देशमुख व पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करत आहेत.