धक्कादायक ! मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार ; महिला दिनादिवशी उघडकीस आला प्रकार, महाबळेश्वरमधील घटना

मुख्याध्यापकाने कुणाला काही सांगू नकोस, असा दम दिल्याने पीडित मुलगी घाबरुन गेली होती. त्रास हाेऊ लागल्याने तिने दि. ८ रोजी आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. आई वडिलांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीला सोबत घेऊन थेट महाबळेश्वर पोलिस ठाणे गाठले. तेथील पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून मुख्याध्यापक दिलीप ढेबे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड केले.

    वाई : महिला दिनाच्या पूर्वसंधेलाच इयत्ता १० मध्ये शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीवर महाबळेश्वरमधील नामवंत शाळेच्या मुख्याध्यापकाने वेळो वेळी बलात्कार केल्याची तक्रार पिडीत मुलीने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल केल्याने संपुर्ण जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त हाेत आहे. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी एक १५ वर्षीय मुलगी आपल्या आई वडिलांसह राहण्यास आहे. ती तेथीलच सेठ गंगाधर माखरीया या नामांकित विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. पंधरा दिवसांपासून शाळा सुरू झाल्याने हि अल्पवयीन मुलगी शाळेत शिक्षणासाठी जात होती. तेथे मुख्याध्यापक म्हणून दिलीप रामचंद्र ठेबे (वय ५०) काम करीत आहेत. या मुख्याध्यापकाने पीिडत मुलीला वेळोवेळी शाळेच्या प्रयोग शाळेत आणि हॉलमध्ये एकटीला बोलावून तु मला फार आवडते, असे सांगून अनेकदा बलात्कार केला.

    दम दिल्याने घाबरली पीडित मुलगी
    मुख्याध्यापकाने कुणाला काही सांगू नकोस, असा दम दिल्याने पीडित मुलगी घाबरुन गेली होती. त्रास हाेऊ लागल्याने तिने दि. ८ रोजी आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. आई वडिलांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीला सोबत घेऊन थेट महाबळेश्वर पोलिस ठाणे गाठले. तेथील पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून मुख्याध्यापक दिलीप ढेबे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड केले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बिंद्रीबिंद्रीय करीत आहेत. पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील शाळांत देश-परदेशातील पालक आपल्या मुलांना लाखो रुपये खर्च करुन शिक्षणासाठी पाठिवतात. परंतु मुख्याध्यापक ढेबेच्या या कृत्यांमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.