murder by firing

    सातारा : तोंडले (ता. खंडाळा) तालुक्यातील वीर धरण परिसरात दारु पिऊन रिव्हॉल्वरमधून गोळीबार करणाऱ्या टोळीला शिरवळ पोलिसांनी अटक केली. सर्व संशयित हे बारामती, खंडाळा तालुक्यातील असल्याची माहिती दिली जात आहे. या घटनेने खंडाळा तालुक्या‍त एकच खळबळ उडाली आहे.

    याप्रकरणी किरण देविदास निगडे (वय ४६, रा. गुळूंचे ता. पुरंदर. जि. पुणे), सूर्यकांत चंद्रकांत साळूंखे (वय २८, रा. कानिफनाथवस्ती, भादे ता. खंडाळा), नवनाथ बबन गाडे (वय ३४, रा. चोपडज, पोस्ट करंजे ता. बारामती. जि. पुणे), माधव अरविंद जगताप (वय ३२, रा. वाकी पोस्ट करंजे ता. बारामती. जि. पुणे), तात्याराम अर्जुन बनसोडे (वय ३८, रा. अंथुर्णे ता. इंदापूर जि. जि. पुणे), विजय ज्ञानदेव साळुंखे (वय ३९, रा. चोपडज (सोमेश्वर) पोस्ट करंजे ता. बारामती. जि. पुणे), योगेश प्रकाश रणवरे (वय ४२, रा. राख ता. पुरंदर. जि. पुणे), वसंत नामदेव पवार (वय ४७, रा. कोळविहीरे, ता. पुरंदर. जि. पुणे), अरविंद धनशाम बोदेले (वय ४१, रा. लवथळेश्वर,जेजूरी ता. पुरंदर. जि. पुणे, मूळ रा. भिवापूर जि. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

    गोळीबार प्रकरणी पोलिसांनी किरण निगडे याच्यावर रिव्हॉल्वर, दोन कार, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केले आहे. किरण निगडे आणि त्याचे मित्र योगेश रणवरे यांनी हवेत गोळीबार करत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थसळी धाव घेतली. गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळत पोलिसी खाक्या दाखविला.

    दरम्यान, या प्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्याचे हवालदार मदन वरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किरण निगडे याच्यासह ९ जणांविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय शस्त्र अधिनियमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत.