१० व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत दरूजच्या श्रवण लावंडने पटकावलं सुवर्णपदक

    वडूज : महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनच्या रॉयल गार्डन, कर्जत, रायगड येथे झालेल्या १० व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातील सुमारे ३५० खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशचे खजिनदार मुकेश सोनवाणे, संकेत धामंडे, साहेबराव ओहोळ, पौर्णिमा तेली, विकास बडेकर यांच्या शुभहस्ते झाला.

    १० व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत सबज्युनियर ४८ ते ५१ वजनी गटात सातारा जिल्हयातील खटाव तालुक्यातील दरूज गावाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रवण लावंड याने सुवर्णपदकाची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या आधी पण मागील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्ण पदके मिळवून उत्कृष्ट कामगीरी केली आहे. त्याच्या या सुवर्ण कार्यामुळे त्याच्यावर सातारासह राज्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत सातारा जिल्हयातील सिनियर गटातून खेळणारे अंशुल कांबळे, प्राजक्ता जावध यांनी सुवर्णपदक पटकावले व शिवराज वरे यांनी रजत पदक पटकावले, या स्पर्धेमध्ये १५ सुवर्ण, ७ रजत, ३ कास्य पदके मिळवून कोल्हापूर संघाने चॅम्पियनशिप चषक पटकवला, दुसऱ्या स्थानी १३ सुवर्ण, ६ रजत, ७ कास्य पदके मिळवून ठाणे जिल्हा संघ व बुलढाणा जिल्हा संघ ८ सुवर्ण, १२ रजत, ८कास्य पदके मिळवूण तिसऱ्या स्थानी राहिला, चौथे स्थान पुणे जिल्हा ग्रामीण संघाने ४ सुवर्ण, रजत,९ कास्य पदके मिळवूण मिळवले.

    पिच्याक सिलॅट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ आहे. हा खेळ संपूर्ण भारत देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये वाढविण्याचे प्रयत्न इंडियन पिच्याक सिलट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले २००९ पासून करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या व संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे पिंच्याक सिलॅट या खेळाचा समावेश १ सप्टेंबर २०२० भारतीय क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या राखीव नोकर भरती मध्ये केला आहे. या खेळाला “युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार”, “भारतीय विश्वविदयालय संघ”, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड व ऑलिम्पिक कांऊसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, युथ गेम व बिच गेम, भारतीय विश्वविदयालय अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये खेळला जातो.

    नुकताच पिच्याक सिलॅट या खेळाचा समावेश क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे पाठविला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना या खेळामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

    स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सुनिल गोगटे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य, कोकण संपर्क प्रमुख किसान मोर्चा, महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र प्रताप सिंग, किशोर येवले यांच्या हस्ते तर ऍडव्होकेट विशाल सिंग, संदीप पाटील, प्रकाश पार्ने, सचिन लावंड, अबू चाऊस, संजीव वरे, गणेश बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.