फलटण येथील म्युकर मायकोसिस शिबिरात ६ रुग्ण बाधित असल्याचा संशय

म्युकर मायकोसीस म्हणजेच काळी बुरशी हा आजार नवीन नसला तरी ह्या आजारावर उपचार करण्यासाठी सर्वत्र रुग्णालये तयार नाहीत. त्यामुळे रुग्णांना सहजासहजी हा आजार झाल्याचे निष्पन्न होत नाही. तरी फलटण डॉक्टर्स असोसिएशन व इंडियन डेंटल असोसीऐशनच्या फलटण व बारामती शाखेच्यावतीने म्युकर मायकोसिस ह्या आजराचे शिबीर आयोजित केले

    फलटण : फलटण शहरामध्ये व तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकर मायोकोसीस म्हणजेच काळी बुरशी या आजाराची लागण सुद्धा होत असल्याचे आता समोर आलेले आहे. म्युकर मायकोसीस म्हणजेच काळी बुरशी हा आजार नवीन नसला तरी ह्या आजारावर उपचार करण्यासाठी सर्वत्र रुग्णालये तयार नाहीत. त्या मुळे रुग्णांचे सहजासहजी हा आजार झाल्याचे निष्पन्न होत नाही. तरी फलटण डॉक्टर्स असोसिएशन व इंडियन डेंटल असोसीऐशनच्या फलटण व बारामती शाखेच्या वतीने म्युकर मायकोसिस ह्या आजराचे शिबीर आयोजित केले हा उपक्रम अतिशय चांगला असून आगामी काळात सुद्धा असेच समाजउपयोगी उपक्रम कायम राबवावेत, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.

    कोळकी, ता. फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे म्युकर मायकोसिस म्हणजेच काळी बुरशीचा निदान शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. त्या वेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी फलटण डॉक्टर्स असोसिएशन व इंडियन डेंटल असोसीऐशनच्या फलटण व बारामती शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरामध्ये ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामधील ६ रुग्णांना प्राथमिक अवस्थेतील म्युकर मायकोसिसची लागण झाली असल्याचा संशय आहे. सदर आढळलेल्या रुग्णांना पुढील तपासणी व उपचारांबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. प्राथमिक अवस्थेमधील म्युकर मायकोसिसचे निदान झाल्याने पुढील मोठा धोखा टळला जाणार आहे. म्युकर मायकोसिसचे लवकर निदान होणेच महत्वाचे असते जर प्राथमिक अवस्थेमध्ये निदान झाले तर नक्कीच त्याला उपचार हे तातडीने देता येतात, अशी माहिती फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने शिबिरामध्ये देण्यात आली.