वाई नाभिक समाजातर्फे दुकाने उघडण्यास परवानगीसाठी तहसीलदारांना निवेदन

गेल्या मार्च २०२० पासून कोरोनो रोगाने वाई तालुक्यातील विविध गावांमध्ये थैमान घातल्याने व दिवसेंदिवस संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने केशकर्तनालये तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते. संपूर्ण २०२० हे वर्ष दुकाने बंद असल्याने या समाजाला स्वतःची मुलांच्या शिक्षणासह कुटुंब उदरनिर्वाह व बँकांचे व्यवहार अश्या विविध समस्यात हा समाज अडकला होता. अशातच पुन्हा जानेवारी ते मार्च २०२१ मध्ये याच कोरोनो रोगाने पुन्हा डोके वर काढल्याने गेल्यावर्षी पेक्षा या ३ महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढवली आहे.

    वाई : वाई तालुक्यातील शेकडो नाभिक समाजातील लोकांनी एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाने ज्याच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो आणि समाजातील सर्व थराच्या जातीभेद विसरून सर्व विधींसाठी या समाजाचा वेळोवेळी उपयोग होतो अश्या लोकांची केशकर्तनालये पूर्णपणे लादलेल्या लॉकडाऊनमध्ये बंद ठेवण्याचे आदेश आल्याने यास कडाडून विरोध करण्यासाठी वीर जीवा महाले नाभिक संघटना वाई मार्फत आज वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना दुकाने सुरु ठेवण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे

    गेल्या मार्च २०२० पासून कोरोनो रोगाने वाई तालुक्यातील विविध गावांमध्ये थैमान घातल्याने व दिवसेंदिवस संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने केशकर्तनालये तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते. संपूर्ण २०२० हे वर्ष दुकाने बंद असल्याने या समाजाला स्वतःची मुलांच्या शिक्षणासह कुटुंब उदरनिर्वाह व बँकांचे व्यवहार अश्या विविध समस्यात हा समाज अडकला होता. अशातच पुन्हा जानेवारी ते मार्च २०२१ मध्ये याच कोरोनो रोगाने पुन्हा डोके वर काढल्याने गेल्यावर्षी पेक्षा या ३ महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढवली आहे. कोरोनोची साखळी तोडण्यासाठी पुन्हा जिल्हाधिकारी यांनी नाभिक समाजाला वेटीस धरून आमची दुकाने पुन्हा बंद केली असल्याने या समाजाचा नवीन लॉकडाऊनमध्ये आर्थिक कणाच मोडला आहे तरी जिल्हा प्रशासनाने आमच्या दुकानांवर नियम व अटी घालून आमची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी देऊन आमच्या प्रपंचाचा गाडा व मुलांची शिक्षणे करण्यास सहकार्य करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण वर्षभराच्या लॉकडाऊनमध्ये नाभिक समाजाच्या दुकानचालकांनी सातारा जिल्ह्यातील कर्जबाजारीलापणाला कंटाळून ज्या कुटुंबप्रमुखांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांनाहि मदत करावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर संस्थापक अशोक सूर्यवंशी, वाई तालुका अध्यक्ष उमेश जाधव, शहराध्यक्ष निनाद तावरे, तालुकाध्यक्ष संपतराव सूर्यवंशी, रमेश जाधव, खजिनदार दिगंबर सूर्यवंशी, संपतराव सूर्यवंशी, सुरेश जाधव, सचिन तावरे,विवेक तावरे, सुनील तावरे व विशाल तावरे या संघटनेच्या पदाधिका-यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.