…अन् कासच्या हिरवाईत रमले एसपी अजयकुमार बन्सल

    सातारा : एरव्ही कामाचा ताण व कायदा सुव्यवस्थेची जवाबदारी सक्षमपणे पेलणारे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल (Ajay Kumar Bansal) हे सहकुटुंब कासच्या निसर्ग सौंदर्यात रमले. पठारावर उमलणाऱ्या फुलांची त्यांनी माहिती घेतली.
    युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश असणाऱ्या कास पठाराचा फुलोत्सव भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे दोन ते तीन लाख पर्यटक भेट देतात. करोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून बंदी असलेल्या कास पर्यटनाला यंदा वन विभागाची परवानगी मिळाल्याने पठारावर पर्यटकांचा वावर सुरू झाला आहे.

    समितीच्या सुविधांचे कौतुक
    सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सहकुटुंब कास पठाराला भेट दिली. येथील निसर्गसौंदर्याचा  त्यांनी भरभरून आस्वाद घेतला. कास परिसरातील कुमुदिनी तळ्याला सुद्धा भेट दिली. कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष मारूती चिकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत, सोमनाथ जाधव, वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी यांनी बन्सल यांचे स्वागत केले.
    पठारावर फुलणाऱ्या दुर्मिळ फुलांची माहिती बन्सलं यांनी घेत समितीकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचे कौतुक केले. कार्यकारी समितीच्या वेबसाईटवर सुध्दा पठारावर फुलणाऱ्या फुलांची माहिती अपडेट करण्यात येते. त्याची सुध्दा माहिती बन्सलं यांनी घेतली.