विरकरवाडी ग्रामस्थ मंडळाकडून कोविड सेंटरला विशेष आर्थिक मदत

    म्हसवड : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून व जनकल्याण ट्रस्टच्या माध्यमातून म्हसवड येथे सुरु असलेल्या मोफत जनसेवा कोविड सेंटरला विरकरवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्याकडून २३ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

    यावेळी‌ विरकरवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष बजरंग विरकर, उपाध्यक्ष गोविंद विरकर, सचिव, सचिन हाके, उपसचिव, उत्तम विरकर, खजिनदार, विलास विरकर, कार्याध्यक्ष कैलास विरकर, विजय विरकर या सर्वांनी विरकरवाडीचे युवा नेते लुनेश विरकर यांच्याकडे सदर रकमेचा धनादेश जनसेवा कोविड सेंटरला दिला. हरीओम म॔गल कार्यालय म्हसवड येथे मोफत सुरू झालेल्या जनसेवा कोविड सेंटरमुळे शहर व परिसरातील शेकडो कोरोना रुग्णांना यामुळे मोठा दिलासा तर मिळालाच आहे, याशिवाय अनेकांचे प्राणही वाचवण्यात येथील डॉक्टर व स्टाफला यश मिळाले असल्याने हे सेंटर कोरोना बाधितांसाठी वरदान ठरु लागले आहे.

    यामुळे या सेंटरला सामाजिक मंडळे व दानशूर व्यक्ती अर्थिक व वस्तू स्वरुपात मदत करीत असून मदतीसाठी येथे दानशूरांची चढाओढ लागली असल्याचे दिसून येते. नुकतेच मुंबई येथील विरकरवाडी ग्रामस्थ मंडळाकडून या सेंटरला वरील रकमेचा धनादेश मंडळाचे सदस्य सचिन हाके यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी घनश्याम केसकर, शुभम लिंगे, आकाश पिसे, मेडिकल स्टाफ काजल नागरगोजे, तेजस खरारे इत्यादी उपस्थित होते.