प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बनविण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

  सातारा : डिसेंबर 2021 रोजी मुदत संपणाऱ्या सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बनविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांच्या स्वाक्षरी चा अध्यादेश ई मेलद्वारे शुक्रवारी संध्याकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.

  सातारा जिल्ह्यात एकूण सोळा स्थानिक स्वराज्य संस्था असून लोणंद व मलकापूर नगरपंचायत वगळता इतर चौदा नगरपालिका आणि नगरपंचायतींची मुदत 22 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे . करोना संक्रमणाच्या निमित्ताने . रथानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार याची चर्चा होती मात्र या समजाला राज्य निवडणूक आयोगाने छेद दिला.

  प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याची प्रक्रिया २३ ऑगस्ट पासून सुरु करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिले आहेत . मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थां ची प्रभाग रचना वेळेवर व सुकर करणे यासाठी हा अध्यादेश निर्गमित करण्याचे सांगण्यात आले आहे . यंदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली असून सातारा शहराच्या हद्दवाढीमुळे 48 प्रभाग निश्चित होणार असून सातारा पालिकेसाठी यंदा अठ्ठेचाळीस नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.

  प्रारूप प्रभाग रचनेसाठी 2011 ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे. ६ फेब्रुवारी २० २० च्या निर्देशानुसार परिच्छेद 4 नुसार सदस्य संख्या निश्चित करून तितक्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करावयाचा आहे. हा आराखडा तयार करताना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे काटेकोर पालन करावयाचे आहे . हद्दवाढ लागू झालेल्या नगरपालिकांनी भौगोलिक बदल आणि क्षेत्र निश्चिती करून त्याचे नकाशे नगरपालिकेने तयार करावयाचे आहेत. पालिकांनी कच्चा आराखडा पूर्ण होताच त्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला तत्काळ कळवावी असे निर्देशित करण्यात आले आहे.

  सातारा पालिका

  एकूण वॉर्ड – 48

  नगरसेवक – 48

  एक सदस्यीय वॉर्डरचना

  हदवाढी नंतरची लोकसंख्या – 61000

  २४ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोग घेणार जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक