चोरीस गेलेला टेम्पो, जनरेटर अवघ्या २४ तासांत मिळाला परत; वाई पोलिसांची कामगिरी

    ओझर्डे : वाई येथून चोरीस गेलेला टेम्पो व जनरेटर अवघ्या २४ तासात हस्तगत करत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी यश मिळविले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर व अहोरात्र मेहनत करून वाई पोलीसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाई-पाचगणी रोडवर हॉटेल सनई शेजारी फिर्यादी संतोष सुर्यवंशी याचे यश बांबू मर्चट नावचे गोडावून आहे.

    ३० रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयाने टाटा कंपनीचा ७०९ ई एक्स कंपनीचा अंदाजे १ लाख रुपये किंमतीचा मिनी ट्रक व एक कमीन्स कंपनीचा १२५ केव्ही पॉवरचा सुमारे ४ लाख रुपयांचा जनरेटर असा एकूण ५ लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला होता. याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी पथक बनवून ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीचा माग काढला. दरम्यान, सोशल मीडियावरूनही पोलीसांना ट्रेस मिळाला. आरोपी जनरेटर विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

    नकली खरेदीदार बनून घेतला शाेध

    पोलीस नकली खरेदीदार बनून मध्यस्तापर्यंत पोहचले व तेथून मूळा डॅम येथे टेंम्पो व जनरेटर विक्रीच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या मुसक्या त्यांनी आवळल्या. पोलीसांनी प्रशांत बाळासाहेब गायकवाड (वय २९) व भैय्या सिकंदर शेख (वय ३४, दोन्ही रा. वळण, ता. राहूरी, जि. अहमदनगर) यांना अटक केली.

    पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर, सहाय्यक फौजदार विजय शिर्के, कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड यांनी ही कारवाई केली. सहाय्यक फौजदार रमेश कोळी करीत तपास करीत आहेत.