robot to serve corona patient
प्रतिकात्मक फोटो

रुग्णालयात दाखल असलेल्या तसेच होम क्वारंटाईन केलेल्या कोरोना रुग्णांपर्यंत गोळ्या-औषधे, तसेच साहित्य पुरविण्याबरोबरच तेथील फरशीची साफसफाई करणारा अनोखा रोबो(robot to serve corona patient) सातारा जिल्ह्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अथर्व पाटील(atharva patil) या विद्यार्थ्याने बनविला आहे.

    सातारा: रुग्णालयात दाखल असलेल्या तसेच होम क्वारंटाईन केलेल्या कोरोना रुग्णांपर्यंत गोळ्या-औषधे, तसेच साहित्य पुरविण्याबरोबरच तेथील फरशीची साफसफाई करणारा अनोखा रोबो सातारा जिल्ह्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अथर्व पाटील या विद्यार्थ्याने बनविला आहे.

    ढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळे हे अथर्वचे मूळगाव असून, त्याने बनविलेल्या उपकरणांना विविध विज्ञान प्रदर्शनातून पारितोषिके मिळाली आहेत. घरात पडून असलेल्या काही वस्तूंसह बाजारातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचाही त्याने वापर केला आहे. हा रोबो बेसला बसविलेल्या चाकांवरून इकडून तिकडे फिरतो. त्याच्या हातावर बसावलेल्या ट्रे मधून औषधे, गोळ्या, तसेच अन्य वस्तू रुग्णांपर्यंत पोचवता येतात. शिवाय त्याला बसविलेल्या स्क्रबलने फरशीची साफसफाईही करता येते. त्यासाठी जंतुनाशक किंवा फिनेलचा कॅन बसविण्याची व्यवस्थाही त्यात केलेली आहे.