राज्यस्तरीय ऑनलाईन वेशभूषा स्पर्धेत जगताप बहिणींचे यश

    कातरखटाव / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : वडूज (ता.खटाव) येथील कु. शिवांजली अतुल जगताप व कु. स्वरांजली अतुल जगताप या भगिनींनी राज्यस्तरीय ऑनलाईन वेशभुषा स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.

    छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शिवाजी भोसले दृकश्राव्य माध्यमाच्यावतीने ही राज्यस्तरीय ऑनलाईन वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये कु. शिवांजली हिने प्रथम व कु.स्वरांजली हिने द्वितीय क्रमांक मिळविला. शिवांजली हिने सावित्रीबाई फुले व स्वरांजली हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई या व्यक्तीरेखा साकारली होती. जगताप भगिनीयेथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेत दुसरीमध्ये शिक्षण घेत आहेत. या स्पर्धेचे गुण व्हिडीओला मिळालेले विव्हर्स व पाच परीक्षकांनी दिलेले मार्क यावर आधारित होते.

    स्पर्धेच्या तयारीसाठी पालक अतुल जगताप, सोनम जगताप वर्गशिक्षक श्री. इंगळे, मुख्याध्यापिका देशमुख यांचे सहकार्य लाभले. जगताप भगिनींचे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण उदमले, विस्ताराधिकारी साळुंखे, आदींनी अभिनंदन केले.