पगार दिला नसल्याने आनेवाडी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे अचानक काम बंद आंदोलन

या टोल नाक्यावर वाई जावली कोरेगाव आणि सातारा या तालुक्यातील शेकडो बेरोजगार तरूण तरुणी कामाला आहेत, पण गेल्या तिन ते चार महिन्या पासून येथील कर्मचाऱ्यांना पगार दिला नसल्याने कर्मचाऱ्यांन वर उपासमारी सारखे संकट कोसळले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती, त्याचा उद्रेक झाल्याने येथील सर्वच कर्मचाऱ्यांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक पणे काम बंद आंदोलन पुकारले.

    वाई: आनेवाडी टोल नाक्यावरील कर्मच्याऱ्यांनी अचानक पणे काम बंद आंदोलन पुकारल्याने, हजारो वाहने टोल न भरताच निघुन गेल्याने टोल नाक्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेला जबाबदार धरुन केंद्रीय रस्ते वाहतुक महामंडळाचे अधिकारी रिलायंस कंपनीवर काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
    तारा-पुणे आणि पुणे-सातारा या महामार्गावर आनेवाडी येथे वाहनांकडून टोल वसुली करण्यासाठी टोलनाका उभा केला आहे. त्याचा ठेका रिलायंस इनफ्रा या कंपनीला केंद्र सरकारने दिला आहे. या टोल नाक्यावर वाई जावली कोरेगाव आणि सातारा या तालुक्यातील शेकडो बेरोजगार तरूण तरुणी कामाला आहेत, पण गेल्या तिन ते चार महिन्या पासून येथील कर्मचाऱ्यांना पगार दिला नसल्याने कर्मचाऱ्यांन वर उपासमारी सारखे संकट कोसळले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती, त्याचा उद्रेक झाल्याने येथील सर्वच कर्मचाऱ्यांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक पणे काम बंद आंदोलन पुकारल्याने हजारो वाहने टोलचे पैसे न भरताच जात असल्याने टोलनाक्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.